आशाताई बच्छाव
प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
29 जुलै 2024 ला वृद्ध पेंशन कलावंतांचा संगीतमय आंदोलनाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने विश्राम गृह भंडारा येथे वृद्ध कलावंत पेन्शन विषयी तथा विविध विषयांवर चिंतन बैठक घेण्यात आली .
या बैठकीचे अध्यक्ष सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिंतन बैठकीचे आयोजक तथा जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, केंद्रीय संयोजक प्रबोधनकार मनोज कोटांगले, जेष्ठ तबलावादक तिर्थानंद बोरकर, संघटनेचे सल्हागार गणेश आथिलकर, भंडारा तहसील अध्यक्ष सुशील सद्धर्मी, पवनी अध्यक्ष लक्ष्मीकांत मेश्राम, लाखांदूर अध्यक्ष स्वप्नील बन्सोड, मोहाडी अध्यक्ष रवी ठवकर, साकोली उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, महासचिव ईश्वर धकाते, जेष्ठ अभिनेत्री गीता रामटेके, महेंद्र गोंडाने, गायक अमर वैद्य,कार्तिक मेश्राम यांच्या उपस्थितीत मध्ये सभा संपन्न झाली.
या सभेत वृद्ध कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 29 जुलै 2024 ला वृद्ध पेंशन कलावंतांचा संगीतमय आंदोलन त्रिमूर्ती चौक भंडारा येथे परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे असे सर्वानुमते ठरले.
या सभेला यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सोमप्रभु तांदुळकर, कलाकार खोब्रागडे, प्रवीण भोंदे, अक्षय मेश्राम, संदीप कोटांगले, गुड्डू बोरकर, भगवान दहिवले व जिल्ह्यातील सर्व कलावंतांनी सहकार्य केले.