Home रायगड शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ ! कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना...

शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ ! कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. १ रुपयात पीक विमा;

43
0

आशाताई बच्छाव

1000551707.jpg

शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ ! कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. १ रुपयात पीक विमा;

 

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहिद मोमीन

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता शेतकरी नोंदणी करिता दि. 15 जुलै अंतिम तारीख होती. परंतु आता एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणीला दि.31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ

देण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे अंकुश माने यांनी दिली आहे.

योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण मिळणार आहे.

ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.

ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.51 हजार 760, रत्नागिरी जिल्ह्यासाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.50 हजार. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.20 हजार, पालघर जिल्ह्यासाठी उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु. 25 हजार.

ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामिंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तीचा अधीन राहून निश्चित केली जाईल. या योजनेंतर्गत भातासाठी केवळ 1 रुपयात जवळजवळ रु.50 हजार पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.

Previous articleजालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा
Next articleअवैद्य सावकारवर सहकार विभागाची धाड; कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्य कागदपत्रे जप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here