Home जालना जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा

जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा

43
0

आशाताई बच्छाव

1000549769.jpg

जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 15/07/2024
शालेय विद्यार्थ्यांसोबत होणारे लैंगिक अत्याचार, त्यातच त्यांच्यासोबत घडणारे गुन्ह्याच्या अनुषंगाने जालना पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद जालना व रोटरी क्लब जालना यांच्या वतीने आज 400 खाजगी शाळेतील व जिल्हा परिषद शाळेच्या”TEENS”Teachers, Educating, Empowering and Nurturing Students “शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली होती.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री वीरेंद्र मिश्र यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री अजय कुमार बंसल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, मानसोपचार तज्ञ डॉक्टर मानसी मोरे तसेच रोटरी क्लबचे डॉक्टर सुरेश साबू, श्री रमेश अग्रवाल, श्री अरुण अग्रवाल, श्री दीपक बगडिया, श्री रवी भक्कड हे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेतस मार्गदर्शन करताना मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांनी बालका विरुद्ध लैंगिक अत्याचार गुन्हे हे शिक्षकांच्या सहकार्याने कसे प्रतिबंध करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी कार्यशाळेत उपस्थित असलेल्या शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की, सदर कार्यशाळेचा उद्देश हा बालका विरुद्ध होणारे लैंगिक अत्याचार, सायबर गुन्ह्याचे बळी पडू नये याकरिता शाळेत बालकांबरोबर जास्त वेळ राहणारे शिक्षक यांच्या सहकार्यातून सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आहे.
तसेच सपोउपनि पूजा कदम, सपोउपनि मनीषा गिरी यांच्या नेतृत्वात बालका विरुद्ध होणारे लैंगिक अत्याचार गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी दामिनी पथक कार्यरत करण्यात आले असून दामिनी पथक, प्रशिक्षित शिक्षक, पोलीस काका व पोलीस दीदी सोबत वेगवेगळ्या शाळेत राबविण्यात येणार आहे.
तसेच जालना पोलीस दलाच्यावतीने -जालना पोलीस- नावाचे व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले असून पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणारे जनजागृती कार्यक्रमांची माहिती नव्याने सुरू करण्यात आलेले चॅनलवर प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here