Home गडचिरोली समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व...

समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

27
0

आशाताई बच्छाव

1000548873.jpg

समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

सावली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सकल विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातर्फे जाहीर सत्कार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
मनुष्याने स्वतःच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. मात्र समाजातील ईतर दुर्बल समाजाच्या व्यथांची जाणीव राखून त्यांच्या समस्या व मूलभूत सोयींकरिता सदैव प्रयत्नशील असावे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करित असताना समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व होय.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथे सकल ढीवर समाजा तर्फे आयोजित जाहीर सत्कार समारंभात सत्कारमूर्ती म्हणुन बोलत होते.

आयोजित सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ताडाम, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, विमुक्त जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्ष तथा माजी प. स. सभापती विजय कोरेवार, माजी प.स. सभापती राकेश गड्डमवार, काँग्रेस शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यारपवार, काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा भोयर, शहराध्यक्ष भारती चौधरी, विमुक्त जाती, भटक्या जमाती सेल अध्यक्ष हरिदास मेश्राम,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, युवा शहराध्यक्ष अमरदिप कोनपत्तीवार तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते तथा बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रकोपात गेले. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने समाज उपयोगी अशा अनेक योजना आणल्या. तर मी ईतर मागास बहुजन कल्याण मंत्री असताना समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या समस्यांना डोळ्यापुढे ठेवून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अमलात आणली. व राज्यातील अनेकांना हक्काचे घर मिळाले. मात्र सरकार जाताच नव्या सरकारने या योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. तर आपण विरोधी बाकावर असताना सुद्धा जनतेचे प्रश्न तेवढेच हिरीरीने सोडवून आज एकट्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3493 घरकुल मंजूर करून घेतली. यात आमचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा गाव पातळीवरील प्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याचे यश असून पुढेही जनसेवेचे कार्य अविरत सुरू राहील. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात घडवून आणलेली सिंचन क्रांती , विकास कामे, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची निराकरण, व क्षेत्र विकासासाठी आपण चालविलेले प्रयत्न व दिन दुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य हे सार्थकी ठरले. यातच मी पूर्णतः समाधानी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. व उर्वरित लाभार्थ्यांचेही घरकुलांची स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी एकट्या सावली तालुक्यात 2365 घरकुलांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल सकल ढीवर समाज तालुका सावलीच्या वतीने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

तर विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेला सततचा पाठपुरावा व शासस्तरावर चालविले प्रयत्न यामुळे तालुक्याच्या वाट्याला हजारोंच्या संख्येने मिळालेले घरकुलरुपी यश हे विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाला विकासाची नवी दिशा मिळाल्याचे मत माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार तथा विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर दिनेश पाटील चिटणुरवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज तालुक्यात २३६५ घरकुल मंजूर झाले त्याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गेडाम, प्रस्ताविक तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहणे,तर आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी केले. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सावली तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

Previous articleपराभवाने खचून न जाता विजयाची तयारी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Next articleलाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती नोंदणी शिबिराचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here