Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात बंदुकीचा धाक दाखवत महिलेच्या……; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संग्रामपूर तालुक्यात बंदुकीचा धाक दाखवत महिलेच्या……; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

39
0

आशाताई बच्छाव

1000546338.jpg

संग्रामपूर तालुक्यात बंदुकीचा धाक दाखवत महिलेच्या……; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
संग्रामपूर :-बुलढाणा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरील करोली घाटात चारचाकी अडवत बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने लुटल्याची घटना दि.२ जुलै रोजी रात्री घडली आहे. या घटनेतील लुटणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील चार आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांनी बुधवारी अटक केली. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५४ वर्षीय महिला अनुपमा संतोष गुडगील्ला ही महिला चारचाकी मध्य प्रदेशमधील बडवाह येथून रात्री 8 वाजता करोली घाटातून घरी परत
वाहनासमोर तोंडाला काळे रुमाल बांधलेले चारजण आडवे आले. व त्यांनी चालक वानरे यांच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून चालकाच्या बाजूला बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन किंमत ३५ हजार रुपये, मंगळसूत्र किंमत ८८ हजार रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपये हा मुद्देमाल लुटून पोबारा केला. घटनेची फिर्याद मध्य प्रदेशातील शहापूर ठाण्यात देण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला होतो. तपासा दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील रिंगनवाडी येथील मुख्य आरोपी प्रशांत रावनकार (३०) याला ताब्यात घेतले. साथीदार असलेला दत्ता शंकर लोणे, अविनाश हरिभाऊ झोपे, (दोघे रा. अकोली), तर अमोल सोळंके (रा. निवाना, ता. संग्रामपूर) या चौघांनाही ताब्यात घेतले आहे. आरोपींनी कडून सोन्याचे २५ ग्राम मंगळसूत्र व घटनेत वापरलेली देशी पिस्तूल व दुचाकी जप्त केल्याची माहिती आहे.

Previous articleबुलढाणा :- वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी !
Next articleबुलढाणा :-लोखंडी रॉडने मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here