Home गडचिरोली आमदार कृष्णा गजबे यांच्या सेवावृत्तीचे पुन्हा दर्शन अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा...

आमदार कृष्णा गजबे यांच्या सेवावृत्तीचे पुन्हा दर्शन अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा गजबे

37
0

आशाताई बच्छाव

1000546249.jpg

आमदार कृष्णा गजबे यांच्या सेवावृत्तीचे पुन्हा दर्शन

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा गजबे

देसाईगंज तालुक्यातील चोप-शंकरपूर मार्गांवर अपघातात होऊन पडलेल्या अपघातग्रस्त जखमीला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल

देसाईगंज/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- अपघात झाला की सामान्य माणूस पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत, तर राजकीय नेते व्यग्र दिनक्रमामुळे त्याकडे लक्ष देत नाहीत; परंतु आमदार कृष्णा गजबे यांनी अपघात होऊन चोप-शंकरपूर मार्गावर पडलेल्या अपघातग्रस्त जखमीला स्वतःच्या गाडीने देसाईगंज येथील रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आमदार कृष्णा गजबे हे कोरेगांव येथील कार्यक्रम आटोपून दुपारी १२.०० वाजताच्या दरम्यान चोप व शंकरपुर मार्ग, चोप जवळ त्यांना एक युवक दुचाकीस्वार अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. हा अपघात पाहून आमदार कृष्णा गजबे यांनी आपली गाडी थांबवली. विचारपूस केली असता तो युवक स्वप्निल लांजेवार रा. चोप/कोरेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले. अपघाता स्थळी ॲम्बुलन्स यायला उशीर असल्यामुळे आमदार कृष्णा गजबे यांनी स्वतःच्या वाहनात गंभीर जखमी असलेल्या चोप येथील स्वप्निल लांजेवार या युवकाला आपल्या सहकाऱ्यांसह देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात स्वतः दाखल दाखल केले व प्राथमिक उपचार करून घेतला. एक संवेदनशील आमदार कसा असतो, याचे मार्मिक उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष आमदार कृष्णा गजबे हे आहेत. याआधी सुद्धा त्यांच्या सालस पणाचे उदाहरण आणि सामान्य राहणीमान व सातत्यपूर्ण पाठपुराव्याची जोड ही मतदारसंघातील सर्वसामान्यांना आपलेपणाची वाटणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here