Home अमरावती अमरावती येथील घटना भरधाव सिटी बसने आजी सह तीन नातवांना उडवले: नऊ...

अमरावती येथील घटना भरधाव सिटी बसने आजी सह तीन नातवांना उडवले: नऊ वर्षे मुलाचा मृत्यू, आजी सह तीन जण गंभीर; बच्चूचा तडफडून मृत्यू 

133
0

आशाताई बच्छाव

1000545787.jpg

अमरावती येथील घटना भरधाव सिटी बसने आजी सह तीन नातवांना उडवले: नऊ वर्षे मुलाचा मृत्यू, आजी सह तीन जण गंभीर; बच्चूचा तडफडून मृत्यू
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती. आजी सोबत एक धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण भावाला येथील शहर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षे चिमुकल्या भावाचा बस खाली चिडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याची थोरली बहीण जखमी झाली.आज १४जुलै रोजी सकाळी१०.१० वाजताच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील सायन्स कोर्स रंगनाच्या प्रवेशद्वारासमोर हा हृदयद्रावक अपघात घडला. अपघातानंतर संतप्त जमावणे बसची तोडफोड केली. प्रीतम गोविंद निर्मळे वय ९ असे मृत बालापासून वैष्णवी संजय निर्मळे वय १२ असे जखमीचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील रहिवासी नर्मदा लक्ष्मणराव निर्मळे वय ६० ह्या एका धार्मिक कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी नातू प्रीतम, नाती वैष्णवी व नेहा संतोष निर्मळे वय १४ यांच्यासह एसटी बसने अमरावती विद्या आल्या. येथील मध्यवर्ती बस स्थानकावर उतरल्यावर ते सर्व सायन्स कोर प्रांरांगणाच्या द्वारासमोरून रुक्मिणी नगर चौकाकडे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजित स्थळी जात होते. त्यावेळी मागून आलेली शहर बस क्रमांक एम एच २७ ए९९५२ने अचानक प्रीतम व वैष्णवीला धडक दिली. या अपघातात प्रीतम हा बसच्या चाकाखाली आला. त्यात चिडून त्याचा मृत्यू झाला. तर वैष्णवी जखमी झाली. या अपघाताच्या वेळेस सोबत असलेल्या आजीचा आक्रोश अनर्थ झाला. डोळ्यादेखत नातूचे गत प्राण झाल्याचे दिसताच आजी नर्मदा यांनी एकच आक्रोश केला. त्या ऑपरेशन प्रत्यक्ष दर्शनी चे मन देखील हे हेलावले. त्यामुळे संतप्त जमावणे बसची चांगलीच तोडफोड केली. सदर घटनेची माहिती सिटी कोतवाली यांना मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी ताफ्यासाहेब घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी जखमी वैष्णवीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे दाखल केले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून प्रीतमच्या मृतदेहराला शववीच्छादनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी शहर बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Previous articleनागोठणे शहरात पूर परिस्थिती अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !
Next articleचाळीसगावात तरुणाकडून बस स्थानकातच गावठी कट्टा जप्त…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here