Home भंडारा १८६० पूर्वी स्थापित साकोली ‘जनपद’ केंद्रीय शाळेसाठी सरसावले मुख्याधिकारी

१८६० पूर्वी स्थापित साकोली ‘जनपद’ केंद्रीय शाळेसाठी सरसावले मुख्याधिकारी

60
0

आशाताई बच्छाव

1000540699.jpg

१८६० पूर्वी स्थापित साकोली ‘जनपद’ केंद्रीय शाळेसाठी सरसावले मुख्याधिकारी

शाळेत मुलांना खेळण्याचे साहित्यासाठी शाळा व्यवस्थापनचे निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथे सन १८६० च्या पूर्वीची स्थापना असलेली भंडारा जिल्ह्यातील दूसरी सर्वात जूनी व आजची फिनीक्स भरारी घेतलेली जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र ०१ गणेश वार्ड साकोली या शाळेत मुलांच्या हितासाठी व्यायाम साहित्य लावण्यात यावे. असे निवेदन शुक्रवार १२ जुलैला शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिले. त्यांनी याची तात्काळ दखल घेऊन येथे लवकरच ही सुविधा लागणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. कारण मुख्याधिकारी मंगेश वासेकर हे स्वतः बालपणी शासकीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असून शासकीय शाळेसाठी ते सरसावले आहेत हे उल्लेखनीय.
साकोली शहरातील गणेश वार्ड स्थित जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. ०१ ( सेमी इंग्लिश ) ही ५२ शाळेंचे नेतृत्व करणारी एकमेव सर्वात जूनी जनपद शाळा आहे. आज येथील पटसंख्या २५० च्या जवळपास भर घेत आहे. मात्र येथील ढिसाळ जिल्हा परिषद कारभारामुळे या शाळेला पाहिजे तेवढे ऐश्वर्य मिळाले नाही. या शाळेत मुलांना शारीरिक व्यायाम, सौंदर्यात बालोद्यान निर्माण करण्यासाठी येथे लोखंडी खेळण्याची साहित्य नगरपरिषदेने द्यावे यासंदर्भात मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना येथील मुख्याध्यापक डि. डि. वलथरे, सहा. शिक्षक टि. आय. पटले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, सदस्य व शाळा प्रसारणचे आशिष चेडगे यांनी निवेदन सादर केले. शिक्षक व सदस्यगणांच्या चर्चेत मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी याची तात्काळ दखल घेतली. आणि लवकरच या मुख्य शाळेत मुलांना शारीरिक व्यायाम करण्यासाठी लोखंडी साहित्य लावण्याचे आश्वासन दिले. व एकदा या १८६० पूर्वीची स्थापित जिल्ह्यातील दूस-या ऐतिहासिक शाळेला लवकरच आम्ही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मुख्याधिकारी यांच्या तात्काळ निर्णयाचे शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समितीने व जिल्हा परिषद शिक्षकवृंदांनी त्यांचे सहर्ष अभिनंदन केले आहे.

Previous articleआता “हॅलीड्रोन” ने होणार शेतात फवारणी सेंदूरवाफात प्रात्यक्षिक सादर करीत केले ड्रोन वितरीत
Next articleजिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांवर उपासमार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here