Home भंडारा आता “हॅलीड्रोन” ने होणार शेतात फवारणी सेंदूरवाफात प्रात्यक्षिक सादर करीत केले ड्रोन...

आता “हॅलीड्रोन” ने होणार शेतात फवारणी सेंदूरवाफात प्रात्यक्षिक सादर करीत केले ड्रोन वितरीत

159
0

आशाताई बच्छाव

1000540694.jpg

आता “हॅलीड्रोन” ने होणार शेतात फवारणी

सेंदूरवाफात प्रात्यक्षिक सादर करीत केले ड्रोन वितरीत

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)
साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील ओम एग्रो संचालक हर्षल कापगते यांनी
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रप्रणालीच्या “इफको” सहाय्याने नवीन तंत्रज्ञानाचे फवारणी “हॅलीड्रोन” साकोली सेंदूरवाफा क्षेत्रात उपलब्ध करून दिले. याचे फवारणी प्रात्यक्षिके शुक्रवार १२ जुलैला कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले असून आता सहज व जलदगतीने किटकनाशक फवारणीला मदत होईल असे याप्रसंगी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सेंदूरवाफा ग्रामपंचायत भवन पटांगणात या “हॅली ड्रोन” शुभारंभ प्रसंगी साकोली तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र झलके यांनी ओम एग्रो एजन्सी कडून सेंदुरवाफा येथे शेतकऱ्यांना पिकांवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणीविषयी मार्गदर्शन करुन त्याचे फायदे समजावून दिले. यावेळी इफको चे श्रेयस महल्ले, कापगते कृषी केंद्राचे संचालक संपत पाटील कापगते, माजी नगरसेवक ॲड. मनीष कापगते, गणेश लंजे, हर्षल कापगते हे उपस्थित होते. शेतकामासाठी न मिळणाऱ्या मजुर वर्गाच्या समस्या, कीटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसोबत होणारे अपघात, साध्या फवारणी पंपाने समांतर फवारणी न होणे व समोर येणारे नवीन नॅनो तंत्रज्ञान जसे की इफकोचे नॅनो युरिया व नॅनो डिएपी हे खते वापरून हळूहळू जमिनीत द्यायची रासायनिक खते यांचा वापर कमी करण्यात आपल्या साकोली सेंदुरवाफा क्षेत्रात जमिनीची सुपीकतेला भर मिळते. वाढवून येण्याऱ्या पिढीला हा “हॅलिड्रोन” नक्कीच वरदान ठरेल असे प्रतिपादन यावेळी ॲड. मनिष कापगते मनीषभाऊ कापगते यांनी केले. यावेळी सेंदूरवाफा क्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांनी याचे प्रात्यक्षिक पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती. हर्षल कापगते यांनी या शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम व लाभदायक यंत्रप्रणाली आणून शेतकरी बांधवांना एक उपहार दिल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे.

Previous articleई पास मशीन मुळे रास्त भाव दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास बिन पगारी फुल अधिकारी
Next article१८६० पूर्वी स्थापित साकोली ‘जनपद’ केंद्रीय शाळेसाठी सरसावले मुख्याधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here