Home नाशिक ‘दि देवळा मर्चेंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक

‘दि देवळा मर्चेंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक

43
0

आशाताई बच्छाव

1000531675.jpg

‘दि देवळा मर्चेंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक

सतीश सावंत – प्रतिनिधी : देवळा |

बँकेत तारण ठेवलेले सोने हे शुद्ध व योग्य वजन असल्याचे खोटे अहवाल बँकेला वेळोवेळी सादर करून देमको बँकेची तब्बल ५४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देवळा येथे घडला असून, याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येथील ‘दि देवळा मर्चेंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि.’च्या देवळा शाखेतील बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र मोतीराम सोनवणे (वय ५० रा. कापशी ता. देवळा) यांनी कर्जप्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने-चांदी तारण ठेवताना सोने व चांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असताना सोनवणे यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला.
सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत या बँकेच्या तब्बल २७ खातेदारांची संगनमत करून कर्जप्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष, त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला. या अहवालावरून बँकेने नमूद २७ संशयित आरोपी खातेदारांना ५४ हजार ७४ हजार रु. कर्ज मंजूर केले. या २७ जणांत कापशी येथील सहा, गुंजाळनगर येथील सहा, देवळा येथील पाच, सुभाषनगर व रामेश्वर येथील प्रत्येकी दोन तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव (वा), सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदारांचा यात समावेश आहे.
त्यामुळे बँकेचे एकूण ५४ लाख ७४ हजार रुपये व अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा शुक्रवार (दि.५) रोजी दाखल करण्यात आला. प्रभारी सहाय्यक पोलीस दीपक पाटील पुढील तपास करत आहेत.

देमको बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून एकच गोल्ड व्हॅल्यूअर होता. आमच्या नवीन संचालक मंडळाने अजून एकाची नेमणूक केल्यावर सोनेतारण विभाग अधिकारी यांना शंका आली. त्यांनी तसे कळवले असता तातडीने सर्व बॅगांचे पुन्हा इनकॅमेरा मूल्यांकन केले. यातील सदोष प्रकरणांबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कर्मचारी व संचालक मंडळाच्या सजगतेने सदर प्रकरण उघडकीस आले असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.” – कोमल कोठावदे, (चेअरमन. देमको बँक देवळा)

Previous articleनाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी
Next articleजालना जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महिला आघाडीची स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here