Home उतर महाराष्ट्र लालपरीची खडखड… प्रवाशांची धडधड नेवाशातील अवस्था; नवीन बस देण्याची मागणी

लालपरीची खडखड… प्रवाशांची धडधड नेवाशातील अवस्था; नवीन बस देण्याची मागणी

47
0

आशाताई बच्छाव

1000531660.jpg

लालपरीची खडखड… प्रवाशांची धडधड
नेवाशातील अवस्था; नवीन बस देण्याची मागणी

सोनई, कारभारी गव्हाणे –महाराष्ट्र सरकारच्या वतीने परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलतीची खैरात सुरू असताना बस वाहनांची अवस्था सलाईनवर आली आहे.
गावागावांत लालपरी म्हणून ओळख असलेली बस बंद झाल्याने अनेक गावांत बसचे दर्शन बंद होऊन त्यामार्गावर बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या वाहने कब्जा केला आहे. लालपरीची खडखड आणि प्रवाशांची धडधड अशी स्थिती झाल्याचे वित्र नेवासे तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
कोरोना संसर्ग स्थितीनंतर नेवासे तालुक्यातील अनेक खेडेगावात आणाऱ्या बसच्या फेन्या बंद झाल्याने त्या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीने जम बसविला आहे. गेल्या अनेक
वर्षांपासून नेवासे आगारास नवीर बस नसल्याने लांब पल्ल्याच्या फेण्या बंद झाल्या आहेत. सोनई-राहुरी, सोनई घोडेगाव, भोडेगाव-कुकाणे, तसेच घोडेगाव-नगर मार्गावर पूर्वीप्रमाणे दर अर्चा तासाला शटल बस सुरु करावी, अशी मागणी सातत्याने होत असताना संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. पर्यायाने या मार्गावर शंभराहून अधिक रिक्षा, जीप व इतर
वाहने नियमित ये-जा करीत आहेत. मागील आठवडयात आम आदमी पक्षाच्या वतीने गपरिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकास निवेदन
देऊन नेवासे आगास नवीन बस देण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर अॅड. सादिक शिलेदार, संदीप आलवणे, प्रवीण तिरोडकर, भैरवनाथ भारसकन, करीम सम्यद व सदस्यांच्या सह्या आहेत. अनेक बस जुन्या झाल्याने त्या मध्येव बंद पडत असल्याने प्रयाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने चाकर मार्ग कावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिलेला आहे. तालुक्यातील सोनई व घोडेगाव येथे बसस्थानक असते, ती येथे नियमित वाहतूक नियंत्रक राहत नाही. याशिवाय मूलभूत सुविधा
नसल्याचे प्रामस्थांनी सांगितले. शालेय विद्यार्थी, ज्येश नागरिक, महिला तपेच विविध सवलतीचे २९ प्रकार यसकरिता आहेत. सरकार सवलती जाहीर करतात. दिवधिवदल होत आहे.
प्रवासी संख्या वाहत असली, तरी बसची संख्या मात्र आहे तेथेच असल्याने बसऐवजी इतर वाहनातून जाणे पसंत केले जात आहे. तालुक्यात शंभराहून अधिक गाये असली, तरी बसस्थानक मात्र तीनच गावांत आहेत. परिवहन महामंडळ व जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शिंगणापूर-शिडी मार्ग अलबेल शनिशिंगणापूर शिर्डी मार्गाकर
रोज हजारो प्रवाशी असताना परिवहन बसची व्यवस्था अजिचात नसल्याने या मार्गावर पाच पोलिस ठाणे असताना जिल्ह्यातील सर्वाधिक बेकायदा प्रवासी वाहतूक होत आहे. सोनई, घोडेगाव, कुकरणे या गावात इतर वाहनांची रोज लाखो रुपयांची
नेवासे तालुक्यात पूर्वी अनेक लहान गावात मुक्कामी बस असायच्या त्या बंद करण्यात आल्याने इतर वाहनांची चलती बादली आहे. नेवासे आगारास नवीन बस देऊन तीर्थस्थान व लांबच्या गाडया सुरू कराव्यात राजेंद्र आघाव, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
66 नेवाने जलाराम सध्या ४६
बस असून पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या बस सुरू आहेत. सोनई, घोडेगाव येथे शटल बस सुरू आहे. येथील सर्व बार सुस्थितीत आहेत. नवीन बसची मागणी करता येत नाही त्या राज्याच्या नियोजनाप्रमाणे येतात.

Previous articleशनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी लटकूंची अरेरावी; पोलिस यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
Next articleसरकारी रास्त भाव दुकानदारांची परिस्थिती तळ्यात मळ्यात? दुकान सरकारी की खाजगी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here