Home जळगाव साखरपुडा कार्यक्रम मधून पर्स लंपास मोबाईलसह रोकडची चोरी

साखरपुडा कार्यक्रम मधून पर्स लंपास मोबाईलसह रोकडची चोरी

117
0

आशाताई बच्छाव

1000529787.jpg

साखरपुडा कार्यक्रम मधून पर्स लंपास
मोबाईलसह रोकडची चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- साखरपुडा कार्यक्रमात फोटो काढण्यासाठी पर्स बाजुला सोप्यावर ठेवलेली पर्स चोरी गेल्याचा प्रकार करगाव शिवारातील रिसोर्टमध्ये घडला आहे. या पर्समधून दोन मोबाईल आणि रोख 45 हजार रूपये असा एकूण 67 हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर दिलीप पाटील रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव यांच्याकडे दि.7 रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम धुळे रोडवरील फेस्टीहोटेल रिसॉर्ट येथे आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी नवरा मुलगा व नवरी मुलगी यांचा फोटोशुटचा कार्यक्रम सुरू असतांना नवरा मुलाच्या आईने आपली पर्स(त्यात 22 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल व रोख 45 हजार रूपये होते)त्यांच्या सोबत आलेल्या पाचोरा येथील महिलेच्या हातात दिली व त्या फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. थोड्या वेळाने पाचोरा येथील त्या महिलेने पर्स सोप्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. दोघीजण फोटो काढून पर्स ठेवलेल्या सोेप्याजवळ आल्या असता त्याठिकाणी पर्स आढळून आली नाही.पर्स गायब झाल्याचे कळताच उपस्थितांनी पर्सचा शोध घेतला परंतू पर्स मिळून आली नाही.
कोणीतरी ही पर्स लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी सागर पाटील यंाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleरोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने अपंग बांधवाना तीनचाकी सायकल वाटप
Next articleशेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आमदार मंगेश चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here