Home अमरावती वेरूळ रोंघे मध्ये पुन्हा अतिसराचे दोन रुग्ण: प्रशासन हादरले; गावात तपासणी, साफ...

वेरूळ रोंघे मध्ये पुन्हा अतिसराचे दोन रुग्ण: प्रशासन हादरले; गावात तपासणी, साफ सफाई सुरू.

47
0

आशाताई बच्छाव

1000528050.jpg

वेरूळ रोंघे मध्ये पुन्हा अतिसराचे दोन रुग्ण: प्रशासन हादरले; गावात तपासणी, साफ सफाई सुरू.
दैनिक युवा मराठा.
सचिन भाऊ ठाकूर
धामणगाव तालुका प्रतिनिधी.
अमरावती (धामणगाव रेल्वे)
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेरूळ रोंघे या ग्रामीण भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन चुलत बहिणीच्या मुलीचा अतिसराने मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास होत नाही, तोच गावात पुन्हा दोन नवीन रुग्न आढळल्याने प्रशासन हादरले आहे. दरम्यान दोन्ही रुग्णावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे आ. प्रताप अडसड यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्याने शनिवारी (दी.६) सकाळपासूनच वेरूळ रोंघे येथे आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीचे सत्र सुरू झाले. गुरुवारी देवांश साव आणि भक्ती सावहे बहिण भाऊ सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेरूळ रोंघे येथे बस स्टँड जवळ एकाच घरात राहणाऱ्या प्रवीण साव यांची मुलगी नंदिनी साव( वय११) व राजेश साव यांची मुलगी चैताली साव (वय ११) या दोघींचा शुक्रवारी अतिसराने मृत्यू झाला. दरम्यान शनिवारी आरोग्य विभागाच्या तपासणी पुन्हा दोन नावे रुग्ण आढळले आहेत. जानवी दामोदर कांबे(वय१०)व तनवी दामोदर कांबे(वय११) या रुग्णाबाबत घटनेचे विधानसभेत प्रतिसाद उमटले. या घटनेचे प्रसाद थेट विधानसभेत उमटले असून धामणगाव रेल्वे विभागाचे आमदार प्रताप अडसळ यांनी विधानसभेत घटनेचे कारण शोधण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. घटनेमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी यावेळी आमदार अडसूळ यांनी केला ११ ठिकाणी लिकेज पाणी असून वीरूळ रोंघे येथे अतिसार सारखी लक्षणे आढळली असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. पाणी केली असता जवळपास ११ ठिकाणी तिथेच असल्याचे आढळले असून, काही ठिकाणी पाईप लाईन सांडपाण्याच्या नादीतून देण्याचे निदर्शनास आले. ची माहिती आमचेप्रतिनिधी सचिन भाऊ ठाकूर यांना डॉ. प्रवीण पारसे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here