Home भंडारा आर्मी सैनिक, साकोली तहसिलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी

आर्मी सैनिक, साकोली तहसिलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी

64
0

आशाताई बच्छाव

1000524066.jpg

आर्मी सैनिक, साकोली तहसिलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी

इंडियन आर्मीचे अधिकारी, पोलीस दलांकडून मानवंदना

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)भारतीय आर्मी दलात ,कार्यरत साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा ( एकोडी ) येथील रहिवासी नितीन वामनराव खेडीकर यांना वयाच्या ३७ व्या वर्षी गुरुवारी ०४ जुलैला दुपारी २ वाजता अकाली वीरमरण आले. ते टेंगा गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होते. शनिवारी ०६ जुलैला बाम्पेवाडा येथे शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंडियन आर्मी व पोलीस दलांकडून तोफांची सलामी देत मानवंदना देण्यात आली.
आर्मी सैनिक, साकोलीचे पुत्र नितीन खेडीकर यांचे पार्थिव शनिवार ०६ जुलैला बाम्पेवाडा येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव गावात येताच तालुक्यातील शेकडो जनतेनी हजेरी लावली. शहीद नितीन खेडीकर यांचे पार्थिव गावातील शाळेच्या मैदानावर दर्शनार्थ ठेवण्यात आले. यावेळी तालुक्याच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी इंडियन आर्मी अधिकारी सचिन गोस्वामी, सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह, तहसिलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक विजय कसोधन, डॉ. पूर्णचंद्रबाबू खेडीकर, वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, चंद्रशेखर आदमने, पं. स. सभापती गणेश आदे, ललित हेमणे, बाम्पेवाडा सरपंच नंदेशिनी मेश्राम, शालिकराम खेडीकर, एकोडी सरपंच संजय खोब्रागडे, विनोद खेडीकर, रमेश खेडीकर, डॉ. पोर्णिमा खेडीकर, खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचे प्रतिनिधी, डॉ. परीणय फुके यांचे प्रतिनिधी दिवाकर मने, आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच. बी. भेंडारकर, भंडारा गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त आर्मी संघटनेचे माजी सैनिक, एकोडी उपसरपंच रिगन राऊत, एकोडी जि. प. क्षेत्राचे सर्व राजकीय प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, समाजप्रबोधन कला संघटना अध्यक्ष भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, पळसपाणी पोलीस पाटील देवानंद सोनटक्के व इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. या शासकीय इतमातात श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आर्मी सैनिक नितीन खेडीकर यांची शौर्यगाथा कथन करून देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी त्यांचा परीवार शोकाकुल झाला होता. “साकोलीचे पुत्र नितीन खेडीकर अमर रहे” या घोषणांनी परीसरात देशोभिमान वातावरण निर्माण झाले होते. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम ठिकाणी नेण्यात आले. येथे शासकीय सोपस्कार नंतर त्यांचे आठ वर्षीय पुत्र परीक्षीत, भाऊ स्वप्निल व अश्विन यांनी पार्थिवास मुखाग्नी दिली.
येथे इंडियन आर्मी, पोलीस दलाने शासकीय इतमातात सैनिक नितीन खेडीकर यांना बंदूकीच्या तोफांची सलामी देत मानवंदना दिली. यावेळी बाम्पेवाडासह एकोडी, किन्ही, चांदोरी, उसगाव, आतेगाव, निपरटोला, मक्कीटोला, शिवणटोला, उमरझरी, पळसपाणी येथील नागरिकांसह सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तांसह तालुका प्रसिद्धी माध्यमातून साकोली मिडीया नेटवर्कचे आशिष चेडगे, रवि भोंगाणे, अनिल बारसागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमाहोरा येथिल अनिस पठाण ठेकेदार यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हा संघटक पदी निवड
Next articleतनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here