Home जालना पिंपळगाव रेणुकाई येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महामेळावा संपन्न

पिंपळगाव रेणुकाई येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महामेळावा संपन्न

85
0

आशाताई बच्छाव

1000524046.jpg

पिंपळगाव रेणुकाई येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महामेळावा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 06/07/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 03/ 07/ 2024 रोजी पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन जि. जालना येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा विदर्भ -मराठवाडा विभागीय मेळावा संपन्न झाला आहे.
या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे मेळाव्याचे मुख्य अतिथी म्हणून हजर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत गौ ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. या मेळाव्यात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपस्थित पदाधिकारी व नागरिकांना संबोधित करतांना राष्ट्रीय अध्यक्षांनी राज्यसह देशात सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून सामान्य जनतेला जगणं कठीण झालेलं असल्याच सांगितल.भ्रष्टाचार हि देशाला लागलेली किड असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, संपूर्ण देशभरामध्ये अवैध धंदे व अवैध देशी दारूची विक्री जोरात सुरू असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी संघर्ष समितीने पुढाकार घेऊन अशा अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण देशामध्ये अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, बनावट देशी दारू विक्री असे अनेक प्रकार घडत आहेत.आणि पोलीस व दारूबंदी अधिकारी यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचेही राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.
आपली लढाई कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात नसुन प्रशासनाच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या विषयी बोलत असतांना शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक ही थांबली पाहिजे स्थानिक गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतीचे दस्तऐवज घेण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजावे लागतात ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार अन्यायकारक व चीड आणणारी आहे. कोणताच तलाठी पैसे घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची काम करत नाही त्यांना शेतीसंबंधी कुठलीच कागदपत्रे देत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा भ्रष्ट ग्रामसेवक, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्वच नागरिकांनी बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. कुठल्याच शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेची काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे धाव घेतली असता ते सुद्धा अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी. आपल्यातलेच काही फितूर त्यांना सहकार्य करीत असून आपल्याच लोकांची पिळवणूक करत असल्याचा खेद त्यांनी यावेळी व्यक्त केला. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर कार्यरत आहे .भारत सरकार मान्यताप्राप्त ही संघटना असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संघटनेचे पदाधिकारी कार्यरत आहेत. देशात काण्या- कोपऱ्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्य जोमाने सुरू असून भ्रष्टाचाराचे विरोधात लढणारी ही एकमेव राष्ट्रीय संघटना आज कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व पदाधिकारी तसेच मराठवाडा व विदर्भ या दोन्ही विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तसेच तालुका पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, राष्ट्रीय संघटक श्री अरुण देशमुख,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री पंडितराव तिडके,प्रदेशकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री वसंतराव देशमुख ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री शंकररावजी देशमुख ,अमरावती विभागीय कार्याध्यक्ष श्री किरण लहाने यासोबतच छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष श्री जगताप, जालना जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा लहाने, जालना जिल्हा सचिव श्री मुरलीधर डहाके, जाफराबाद तालुका अध्यक्ष श्री रामदास कदम, भोकरदन तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, भोकरदन तालुका उपाध्यक्ष श्री सुनील उंबरकर, जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री शालिक्राम आहेर, श्री डिगांबरराव जाधव भोकरदन,जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव तौर, लहान जिल्हाध्यक्ष श्री देवेंद्र मिसाळ, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री अंकुश डहाके यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.यावेळी संघटनेच्या माध्यमातून अनेक सतत कार्यरत व संघटनेच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे राज्याचे प्रदेश श्री वसंतराव देशमुख यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री वसंतराव देशमुख यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर निवड केली व तसे नियुक्त पत्र त्यांना या मेळाव्यात देण्यात आले.यासोबतच अनेक महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षांसह जिल्हा व तालुका स्तरावरील महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली.राज्यात सर्व वेगवेगळ्या विभागात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मेळावे घेणार असल्याचे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी सांगितले.

Previous articleजयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह…
Next articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here