Home जालना मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष मोहीम  –  शेख महेमूद

मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष मोहीम  –  शेख महेमूद

51
0

आशाताई बच्छाव

1000496123.jpg

मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष मोहीम  –  शेख महेमूद                   जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-
जालना जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदार पुनर्रचनेचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्या अनुषंगाने जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे आणि नव मतदाराचा यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून जालना शहरात समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी दिली आहे .
जालना शहरातील मतदार यादीतील नावे मोठ्या प्रमाणात वगण्यात आल्याची बाब लोकसभा निवडणुकीत दिसून आली आहे व तसेच नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिनांक 25 जून ते 24 जुलै 2024 मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला केला आहे यादरम्यान मतदारांनी आपल्या नावाचा मतदार यादीत रीतसर समावेश करून घेण्यात यावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले आहे .
मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक वार्डामध्ये काँगेस पक्षाचे कार्यकर्ते मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे .
दिनांक 25 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान हरकती घेता येणार आहे , तर दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निवडणूक आयोगा कडून मतदार यादी प्रसिद्ध केल्या जाईल , मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून काँगेस पक्षाकडून जालना शहरात चार पदाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनुक्रमे योगेश पाटील , बाबासाहेब सोनवणे , जावेद अली , गणेश चांदोडे अशी त्यांची नावे आहेत.

Previous articleजिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा
Next articleपिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार व प्रशासक कंत्राटी टक्केवारीत गुंग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here