Home गडचिरोली इंदिरानगराच्या विकासासाठी भरीव निधी आमदार डॉक्टर देवरावजी होळी

इंदिरानगराच्या विकासासाठी भरीव निधी आमदार डॉक्टर देवरावजी होळी

35
0

आशाताई बच्छाव

1000489158.jpg

इंदिरानगराच्या विकासासाठी भरीव निधी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

इंदिरानगर येथील ४० लक्ष रूपयांच्या रस्त्यांच्या कामांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते लोकार्पण

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नागरिकांची उपस्थिती

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली शहरातील इंदिरानगर प्रभागातील ४० लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या बांधकामाचे लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते पार पडले. इंदिरानगराला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यातही या नगराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी उपस्थित नगरवासीयांना दिले.

याप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे, माजी न प उपाध्यक्ष अनीलभाऊ कुनघाडकर, शहराच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ कविताताई उरकुडे ,नगरसेवक केशवजी निंबोड , शहर महामंत्री विनोद भाऊ देवोजवार ,महामंत्री विवेकजी बैस, राजू शेरकी, श्याम वाढई , अर्चनाताई निंबोड, स्वातीताई चंदनखेडे, योगाजी भांडेकर ,रामभाऊ सातपुते ,अशोकजी मांडेकर, धर्मदेव उडान , दीपक भांडेकर , मयूर कुनघाडकर यांचेसह स्थानीक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here