Home नांदेड एक रूपयात भरा पीकविमा; १५ जुलैची डेडलाईन

एक रूपयात भरा पीकविमा; १५ जुलैची डेडलाईन

65
0

आशाताई बच्छाव

1000488710.jpg

एक रूपयात भरा पीकविमा; १५ जुलैची डेडलाईन

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड (देगलूर) :

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम- २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा भरावा, असे अवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी

शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत मोठा सहभाग घेतला होता. खरीप २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. विमा योजनेत समाविष्ट पिकातभात (धान), खरीप
ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे

पिक निहाय विमा संरक्षित रक्कम

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी

४०००० ते ५१७६०, ज्वारी २०००० ते ३२५००, बाजरी १८,००० ते ३३,९१३, नाचणी १३७५० ते २००००, मका ६००० ते ३५५९८, तूर २५००० ते ३६८०२, मुग २०००० ते २५८१७, उडीद २०००० ते २६०२५, भुईमुग २९००० ते ४२९७१, सोयाबीन ३१२५० ते ५७२६७, तीळ २२००० ते २५०००, कारळे १३७५०, कापूस २३००० ते ५९९८३, कांदा ४६००० ते ८१४२२.

Previous articleबोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा
Next articleपाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here