आशाताई बच्छाव
राजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाला सरकारने आडकाठी आणू नये याकरिता त्यांच्या समर्थनार्थ
विविध आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत जय भीम नगर पवई हिरानंदानी येथील 750 कुटुंबीयांना त्वरित न्याय द्या
याकरिता महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जय भीम नगर पवई हिराचदाणी येथील उध्वस्त करण्यात आलेल्या कुटुंबीयांना त्वरित निवारा उपलब्ध करून देण्यात यावा याकरिता विविध आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले .जय भीम नगर पवई हिराचंदानी येथील 750 झोपड्या तोडून ज्या कुटुंबीयांना बेघर केले त्यांना न्याय न्याय मिळेपर्यंत डॉ राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्यांना सरकारने कोणतेही अडचण आणू नये व पोलिसांनी हस्तक्षेप करू नये पवईच्या झोपडपट्टी तोडून ज्या 750 कुटुंबीयांना बेघर केले आहे त्यांना त्यांच्या मालकीची जागा मुंबई येथे उपलब्ध करून निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,जय भीम नगर पवई हिराचंदानी येथील बौद्ध अनुयायी यांच्यावर गावगुंड ,बिल्डर लाबी, बीएमसी प्रशासन ,पोलीस विभाग, महाराष्ट्र सरकार ,यांच्या सहकार्याने त्यांच्या झोपड्या घरी उध्वस्त केले आहे तेथील नागरिक तीस वर्षापासून वास्तव्यात असताना सुद्धा झोपड्या उध्वस्त करताना बौद्ध अनुयायी ,आंबेडकरी बांधव, घरगुती महिला ,म्हातारे व मुले यांना जबरदस्तीने मारहाण केली त्या विरोधात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी दिनांक 16 जून 2024 रोजी पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा केली .अन्याय केलेल्या लोकांवर एफ आय आर दाखल करण्याची विनंती केली .परंतु जातीवादी मानसिक तेथील पोलीस विभागाने फक्त आश्वासन दिले. त्यामुळे मुंबई शहरातील पवई हिरानंदानी च्या झोपडपट्टीचे 750 घरे तोडून अनुसूचित जाती व बौद्ध नागरिकांच्या ऐन पावसाळ्यात बेघर करून पोलीसमार्फत अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत महिलांना मारहाण करून गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्याच्या बाबतीत डॉ राजरत्न आंबेडकर व तेथील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलने करीत आहेत .त्यांना सरकारने कोणत्याच प्रकारे अडचणीतआणू नये व पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करू नये .देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जय भीम नगर पवई येथील जनसामान्य नागरिकांना निवारा ऐन पावसाळ्यात तोडून प्रशासनाने केलेल्या अत्याचाराच्या गैर संविधानिक आहे .एकीकडे देशाचे प्रधानमंत्री सामान्य माणसांना घरे बांधून देण्याची घोषणा करतात व दुसऱ्या बाजूला प्रशासन झोपडपट्टी तोडून निवारा असणाऱ्यां बेघर करीत आहेत देशाच्या नागरिकांना अन्न वस्त्र व निवारा देणे हे सरकारचे संविधानिक कर्तव्य असूनही जर अशा प्रकारे प्रशासन आडमोठेपणा दाखवत असेल तर ते भारतीय नागरिक खपवून घेणार नाही .पवईच्या झोपडपट्टी तोडून ज्या 750 कुटुंबना बेघर केले त्यांना घर उपलब्ध करून त्यांच्या निवाऱ्याची सोय लवकरात लवकर करून देण्यात यावी .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ राजरत्न आंबेडकर यांनी जय भीम नगर पवई हिरानंदानी येथीलझोपड्या तुटल्या त्या विरोधात व त्यांच्या मालकीची जागा मिळवून देण्यात जे आंदोलन उभे केले त्यांना आमच्या आंबेडकरी जनता तसेच दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भंडारा जिल्हा तर्फे त्या आंदोलनास न्याय मिळेपर्यंत समर्थ आहे. निवेदन देताना इंजिनीयर रूपचंद रामटेक अध्यक्ष भारतीय बुद्ध महासभा भंडारा जिल्हा अरुण गोंडाने जिल्हाध्यक्ष सोशल फोरम भंडारा, कैलास गेंडाम , मोरेश्वर गजभिये,नित्यानंद मेश्राम ,अशोक मेश्राम ,पत्रकार कालिदास खोब्रागडे, डॉक्टर प्रकाश कोटांगले ,युवराज मोटघरे ,आचार मेश्राम, विलास मेश्राम ,आसिफ रंगारी, संजीव भांबोरे,रोशन खोब्रागडे ,अरविंद घारगावे नरेंद्र भोयर ,भागवत मेश्राम ,सत्यवान मेश्राम ,राम रतन मेश्राम ,छबीला नंदेश्वर ,प्रमिना टेंभुरकर, रत्नमाला वैद्य, सुदेश वैद्य ,चंद्रशेखर खोब्रागडे ,श्रीकांत नागदेववे, श्रीराम बोरकर ,अंबादास नागदेवे ,सीडी गौरी, व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते