Home अमरावती प्रकल्प बाधितेच्या अडचणी सोडवण्यासाठी माहिती सादर करा: विभागीय आयुक्त डॉ. निधी पांन्डेय...

प्रकल्प बाधितेच्या अडचणी सोडवण्यासाठी माहिती सादर करा: विभागीय आयुक्त डॉ. निधी पांन्डेय यांचे संबंधितांना निर्देश.

50
0

आशाताई बच्छाव

1000478391.jpg

प्रकल्प बाधितेच्या अडचणी सोडवण्यासाठी माहिती सादर करा: विभागीय आयुक्त डॉ. निधी पांन्डेय यांचे संबंधितांना निर्देश.
दैनिक युवा मराठा.
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
शेतकरी व नागरिकांच्या जमीन अधिग्रहणातून प्रकल्पाची उभारणी होत असते. त्यामुळे संबंधितांना त्यांच्या मोबदला व सर्व सुविधायुक्त ठिकाणी नागरिकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त आहे. प्रकल्प बाधितांच्या अडचणी काल मर्यादेत सोडविण्यासाठी सिंचन प्रकल्पांतर्गत असलेला भूसंपादन व पुनर्वसनाशी संबंधित अडचणीचा सध्या स्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी मंगळवारी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त अंतर्गत येणाऱ्या भूसंपादन व पुनर्वासन विषयक अडचणीत आढावा डॉ.पाण्डेय यांनी घेतला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार.जि.प. सी इ ओ संतोष जोशी, उपयुक्त सामान्य प्रशासन संजय पवार, उपयुक्त पुनर्वसन गजेंद्र बावणे, उद्धव वर्धा सिंचन मंडळ व अमरावती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता, भूसंपादन उपजिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते
बैठकीत अमरावती जिल्ह्यातील सिंचन अनुषा अंतर्गत असलेल्या चंद्रभागा प्रकल्प, मी मग्न पेढी व पिढी बॅलेन्स या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन व भूसंपादन क्षेत्रीय स्तरावर असलेल्या अडचणी बाबत विभागीय आयुक्त यांनी सविस्तर आढावा घेत संबंधित यंत्रणा सोबत चर्चा केली. प्रकल्पाच्या भूसंपादन व पुनर्वसंच्या अडचणी येथील नागरिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने सोडवण्यात, अशा सूचना डॉ.पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना केला. भूसंपादन व त्यानंतर तेथील नागरिकांचे पुनर्वसन सुरळीतपणे होण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पुनर्वसनाचा प्रक्रिया होत असताना नागरिकांच्या सूचना व हरकती ही विचारात घ्यावेत. असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ.पाण्डेय यांनी दिले. अप्पर वर्धा प्रकल्पांतर्गत सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पिकांचे उत्तमरीत्या नियोजन करण्याचा सूचना विभागीय आयुक्तांनी कृषी विभागाला दिल्या. प्रकल्प बाधित चे प्रश्न व अडचणी सुनियोजित पद्धतीने सोडविण्यासाठी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या भूसंपादन व पुनर्वसन विषयक अडचणी बाबत सध्या स्थिती दर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या.

Previous articleयुवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा – माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण
Next articleश्रीरामपूरला दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उम्मती फाऊंडेशन कडून संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here