आशाताई बच्छाव
चाळीसगाव शिवारातून उभ्या खांबावरील विजेच्या तारा चोरी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील प्रतिनिधी- चाळीसगाव शिवारातून शेतातील 10 इलेक्ट्रीक पोलवरील सुमारे 50 हजार रूपये किंमतीच्या 3800 मिटर लांबीच्या तारा चोरून नेण्याचा पराक्रम चोरट्यांनी केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यंाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव शिवारातील पाटणादेवी रोड लगत असलेल्या इलेक्ट्रीक डीपीपासून जाणार्या इलेक्ट्रीक लाईनवरील भरतसिंग नरसिंग पाटील यांच्या शेत गट क्र.152/1/ ब ते शेत गट क्र.153/1/ब व पांडुरंग हिंमत शिंगटे यांच्या शेतामधील इलेक्ट्रीक पोलवर असलेल्या महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहीनीच्या प्रत्येकी 3800 मिटर लांब असलेल्या 50 हजार रूपये किंमतीच्या तीन तारा दि.10 रोजी सायंकाळी 6 ते दि.11 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या.
हा प्रकार शेतकर्याच्या लक्षात आल्याने त्याने महावितरण कंपनीला ही माहिती दिली. महावितरणच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आसपास अल्युमिनीअम तारांचा शोध घेतला पण त्या मिळून आल्या नाही. याप्रकरणी महावितरणचे विद्युत सहाय्यक रामेश्वर वसंत सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.