Home बुलढाणा गुन्हेगारांचा कर्दनकाळ लेडी सिंघम स्मीता म्हसाये

गुन्हेगारांचा कर्दनकाळ लेडी सिंघम स्मीता म्हसाये

42
0

आशाताई बच्छाव

1000474907.jpg

गुन्हेगारांचा कर्दनकाळ लेडी सिंघम स्मीता म्हसाये
युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

मोताळा, दि. १८
महिलांवर होणारे अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्यासाठी आपणही काहीतरी करावे, हा विचार मनी होता. किरण बेदी यांना आदर्श ठेवीत पोलिस दलात भरती होण्याचे ध्येय मनी ठेवून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून निवड झाली. पहिली पोस्टींग अमरावती शहर येथे झाली. सध्या बोराखेडी

पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी कर्तव्यावर असलेल्या स्मीता म्हसाये यांनी चोखपणे कर्तव्य बजावित देशद्रोह, खून, दरोडे याच्यासारख्या शेकडो गुन्ह्याची उकल करीत पोलीस दलात ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख निर्माण केली आहे.

समाजात व आजुबाजूला अन्यायकारक गोष्टी घडतात तेंव्हा आपण हे थांबविण्यासाठी काहीतरी करावे, अशी स्मीता म्हसाये यांच्या मनात प्रबळ

इच्छा होती. किरण

बेदी आदर्शाने त्या प्रेरीत झाल्या होत्या. लग्नाआधी कोणतेही क्लास न लावता कठोर परिश्रम करीत त्यांनी एमपीएससीची परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. पहिली पोस्टिंग अमरावती शहर येथील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये झाली. या ठिकाणी नेमणूकीस असतांना एका चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला गजाआड केले. नव्हेतर त्यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपीला

वीस वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सुरक्षा दलाच्या माध्यमातून मुली व महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना अद्दल घडविली.

लहान मुलींचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल नाशिक पोलिस अॅकडमी इथे त्यांची निवड करण्यात आली होती. विविध पोलीस स्टेशनमध्ये नेमणूकीस असतांना त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. २०१९ मध्ये मलकापूर शहर पोलीस स्टेशनला असतांना त्यांनी नकली उंटबिडी प्रकरणाचा तांत्रिक पध्दतीने तपास करून
महिन्याभरात देशद्रोहाच्या गुन्ह्याचा उलगडा

नकली नोटा प्रकरणांमध्ये विविध राज्यांमधून आरोपींना अटक करत व एक महिन्यांमध्ये नकली नोटा प्रकरणाचा उलगडा केला. मलकापूर येथे २०२३ मध्ये एका पीडितेची पाकिस्तान बॉर्डर जवळील कछ भोज येथे विक्री व लहान मुलांचे अपहरण प्रकरणाचा तपास करीत विविध राज्यातून अटक करुन महिला व मुलांची सुखरुप सुटका केली.

पाच आरोपींना परराज्यातून अटक केली होती.

यांच्या या कमगिरीबद्दल त्यांना २०२२ मध्ये गौरविण्यात आले होते. कॅफे, हॉटेल, लॉजिंगवर धाडी टाकुन १०० पेक्षा जास्त कार्यवाही करुन महिला व मुली

करिता भयमुक्त वातावरण तयार केले असून सद्या त्या बोराखेडी येथे नेमणूकीस असून त्या बारोखेडी पोलीस स्टेशनअंतर्गत फोफावलेली गुन्हेगारी रोखण्यात कसे यश मिळवतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here