Home जालना जालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी. 

जालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी. 

41
0

आशाताई बच्छाव

1000471786.jpg

जालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी.

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)

उन्हाळ्याच्या दीर्घ सुटटयानंतर विद्यार्थी हे आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळेत येणार असल्या्ने शाळा प्रारंभ दिवस हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होण्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गत्ती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जालना शहर महानगरपालिकेतर्फे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.  याकरिता जालना शहर महानगरपालिकेंतर्फे ”पालक अधिकारी” म्हणून १५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबत आज मा. आयुक्त श्री.संतोष खांडेकर, मा. उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड तसेच विविध विभागातील कार्यरत अधिकारी यांनी आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी सकाळी ८:०० वा. जालना शहर महानगरपालिकेंतर्गत १६ शाळांमध्यें भेट देऊन “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रवेश पंधरवाडयात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी मा. आयुक्त यांनी मनपा चंदनझिरा शाळेतील सकस आहाराचा आस्वाद घेवुन शाळेतील मुख्‍याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
सदर उपक्रम यशस्‍वीपणे पार पाडण्याकरिता श्री. केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त , श्री. विजय फुलंब्रीकर, कार्यालयीन अधिक्षक, श्री. सय्यद सऊद, अभियंता, श्री. राजेश बगळे, अभियंता, श्री. संजय वाघमारे, अभियंता, श्री. शोएब कुरेशी, कर अधिकारी, श्री. श्रीकांत गिते, सहाय्यक नगर रचनाकार, श्रीमती तेजश्री शिंदे, सहाय्यक नगर रचनाकार, श्री. रामेश्वर घोळवे, विभागप्रमुख एनयुएलएम, श्री. राहुल देशमुख, मालमत्ता अधिक्षक, श्री. विजय सांगळे, शहर अभियान व्यवस्थापक, श्री. पांडुरंग डाके, शहर अभियान व्यवस्थापक, श्री. माधव पानपट्टे, अग्निशमन अधिकारी, श्री. पंडीत पवार, स्‍वच्छता विभाग प्रमुख इत्यादीं

Previous articleवाशिममध्ये महेश नवमीच्या निमित्ताने शोभायात्रा
Next articleकोरड्या तलावात सापडले मानवी सांगण्याचे अवशेष: सांगळुदशेत शिवराज खळबळ; चर्चेला उधान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here