आशाताई बच्छाव
वनसगांव विद्यालयात थाटामाटात नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत….
विज्ञान शिक्षक अर्जुन चव्हाण यांची प्रभारी पर्यवेक्षक पदी नियुक्ती-
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१५ जून २०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शिवाजी नाना शिंदे, पालक वाळूजी वाघ,प्राचार्य सी.डी.रोटे यांचेसह विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अर्जुन चव्हाण यांना प्रभारी पर्यवेक्षक म्हणून कामकाज पाहण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.इ.१० वी व १२ वी मधील उत्तीर्ण व गुणानुक्रम संपादन करणा-या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्र.पर्यवेक्षक अर्जुन चव्हाण, उपशिक्षक भिका भवर,मनिराम महाले,अरविंद वसावे,अरुण वाघ,बाळासाहेब गांजवे,नितीन पिंगळे, आनंदा अहिरे,कुंदनकुमार जाधव,प्रिती काळे,दिपक गायकवाड, उमा चव्हाण, ज्ञानेश्वर कुशारे, ममता वळवी,संदिप वन्से,सुनिल गांगोडे,उमेश कुमावत,रत्नाकर केदारे ,ज्यु.काॅलेजचे प्रा.मनिषा मेनगर,ए.एस.गायकवाड,योगिता जाधव,विजय पांगुळ, गणेश कोलते,सुनिता शिंदे,अक्षय सोमवंशी,वैशाली रायते तसेच नितीन निकम,भाऊसाहेब धामणे,शांताराम पवार,प्रशांत शिरसाठ,संकेत निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.