Home वाशिम शेतीमध्ये टॉवर उभारणी जागेच्या मोजमापास पॉवर ग्रिड कंपनीकडून विलंब

शेतीमध्ये टॉवर उभारणी जागेच्या मोजमापास पॉवर ग्रिड कंपनीकडून विलंब

76
0

आशाताई बच्छाव

1000465386.jpg

 

शेतीमध्ये टॉवर उभारणी जागेच्या मोजमापास पॉवर ग्रिड कंपनीकडून विलंब
दहा वर्षापासून प्रतिक्षा : नुकसान भरपाईपासून किनखेडा येथील शेतकरी वंचित
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- वर्ष २०१४ मध्ये शेतात उभारलेल्या वर्धा टु औरंगाबाद १२०० केव्ही पॉवरच्या जागेचे मोजमाप करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून टाळाटाळ व विलंब होत आहे. सदर शेतीचे मोजमाप करुन शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व तालुका संघटक रघुनाथ खुपसे यांच्या नेतृत्वात १० जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून वर्ष २०१४ साली तालुक्यातील किनखेडा येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतात टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यावेळी शेतकर्‍यांना कंपनीकडून नुकसान भरपाईच्या सुचनेबाबत केवळ पावती देण्यात आली. मात्र जागेचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यानंतर शेतकर्‍यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी निवेदन दिली. मात्र प्रशासनाने या शेतकर्‍यांच्या निवेदनाला अद्यापही दाद दिली नाही. याबाबत शेतकर्‍यांनी भ्रमणध्वनी वरुन पॉवर ग्रीडच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून नुकसान भरपाईची रक्कम प्रशासकीय कार्यालयात पाठविली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र संबंधीत कार्यालयाकडून अद्यापही या शेतकर्‍यांच्या शेताच मोजमाप झाले नसल्यामुळे गेल्या दहा वर्षापासून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे झाडासहित मोजमाप व पंचनामा करुन शासनाच्या नविन जीआर नुसार मोबदला देण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर भगवान लांडकर, गणेश भालेराव, शाहीराम टेकाळे, राजु कासट, दत्ता इंगोले, नितेश खांबलकर, गजानन खांबलकर, पार्वताबाई इंगोले, लक्ष्मी लांडकर, नामदेव गायकवाड, कुंडलीक धाबे, सुनिल लांडकर, विजय लांडकर, विश्वनाथ इंगोले, माणिक इंगोले, ज्ञानेश्वर लांडकर, नामदेव खुपसे, सुभाष कासट, मंगला खांबलकर, भाऊराव खांबलकर, रघुनाथ खुपसे, कैलास लांडकर, राजेश कासट, विसांबर बुंधे, प्रकाश गायकवाड, विशाल भालेराव, बाबाराव शेळके, दिनकर पाटील आदींच्या सह्या आहेत.

Previous articleप्रबोधनकार तनुजा नागदेवे यांचा साकोली तहसिलदरा तर्फे सत्कार
Next articleसंतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here