Home बीड मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल, घडी वापरण्यास बंदी

मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल, घडी वापरण्यास बंदी

37
0

आशाताई बच्छाव

1000426462.jpg

मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल, घडी वापरण्यास बंदी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:०३ जून २०२४ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक ०४ जून २०२४ रोजी होणार आहे. ३९ बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नाथापूर रोड शासकीय तंत्रनिकेतन येथे आहे. मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी असण्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर, सहाय्यक, सूक्ष्मनिरीक्षक, शिपाई उमेदवारांचे नेमलेले प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची मनाई आहेच. यासह अँड्रॉइड मोबाईल घड्याळ मोबाईलच्या पद्धतीने चालवली जाते असे कुठल्याही तांत्रिक उपकरणे सोबत ठेवण्याची ही बंदी असेल. अशा प्रकारच्या तांत्रिक वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी वापरण्यात आल्यास प्रशासन त्यांच्यावर कडक कार्यवाई करेल असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत. तरी मतमोजणी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक शिपाई उमेदवाराचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी या सर्वांना मोबाईल अँड्रॉइड घडी तसेच तस्सम तांत्रिक उपकरणे मतमोजणी कक्षात घेऊन जाण्याची सक्त मनाई असेल. याची दखल सर्वांनी घ्यावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous article१० लाखांची खते,बियाणे सील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
Next articleइयत्ता ३ री ते १२ वि इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृति वगळून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here