Home बुलढाणा जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज जप्त

जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज जप्त

52
0

आशाताई बच्छाव

1000421928.jpg

जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज जप्त
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
मोताळा :- तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या भाडगणी शिवारातील शेतात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती बोराखेडी पोलीसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ३० मे रोजी बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात बोराखेडी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने ३० मे रोजी जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी येथे पिंपळखुटा येथील कैलास सुखदेव उमाळे, जळगाव जामोद येथील शे. याकूब शे. रऊफ, भास्कर काशीराम येवुल, सैय्यद निजाम सैय्यद उस्मान, शे. कलीम शे. अजीज, दाताळा येथील दिलीप मारोती बावस्कर, भाडगणी येथील गौतम रामधन राणे, उमाळी येथील बाबुसिंग गुलाबसिंग चव्हाण या आठ जणांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ हजार ३१० रुपये नगदी, ७ दुचाक्या व एक चारचाकी वाहनसह ३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई..

बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजवंत आठवले, पोलिस हेडकॉन्स्टेबल नंदकिशोर धांडे, नायक पोलिस कॉन्स्टेबल विजय पैठणे, मंगेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चिंचोले, गणेश बरडे, आकाश यादव, गणेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.

Previous articleकेजचा तहसीलदार फरार ? तर कोतवाल अडकला एसीबीच्या जाळ्यात
Next articleअंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here