Home नाशिक आदिवासीबहुल बागलाणमध्ये आदिवासीचा कल काँग्रेसकडे ?

आदिवासीबहुल बागलाणमध्ये आदिवासीचा कल काँग्रेसकडे ?

226
0

आशाताई बच्छाव

1000419041.jpg

आदिवासीबहुल बागलाणमध्ये आदिवासीचा कल काँग्रेसकडे ?
ताहाराबाद,(प्रतिनिधी,प्रविण भील)नुकत्याच झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा आदिवासी बहुल बागलाण तालुक्यातील आदिवासीनी काँग्रेसला पाठिंबा देऊन पहिल्यांदाच तालुक्यातील भाजप पुढे आव्हान उभे करून दिले.गत निवडणूकित अच्छे दिनला भुलून भाजपला दोन वेळा तालुक्यातील आदिवासीनी भरघोस मतदान केले. परंतु बागलाण तालुक्यात भाजपचे आमदार धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असूनही गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेत आदिवासीचे एकही प्रश्न कोणी मांडला नाही तसेच विधानसभेत देखील गेल्या पाच वर्षांपासून भाजपचे आमदार असूनही आदिवासी समाजाचे कुठलेही प्रश्न लोकप्रतिनिधीनी मांडले नाहीत. त्याचप्रमाणे आदिवासीच्या बाबतीत मणिपूरचा प्रश्न असेल, वनजमिनीचा प्रश्न असेल, खावटी योजना बंद झाली,डीबीटी असेल, आदिवासी आश्रम शाळेतील मुलींवरील विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार असतील, कुपोषण, शिक्षण, बेरोजगारी, पेसा कायद्याची अमलबजावणी असे अनेक प्रश्न असूनही आदिवासीचे कुठलेही प्रश्न लोकसभा वा विधानसभेत लोकप्रतिनिधीनी मांडले नाहीत. म्हणून यावेळी बागलाण तालुक्यातील आदिवासी काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण भील,जिल्हा सरचिटणीस सचिन सोनवणे, वैभव मोरे, भाऊसाहेब माळी, शशी बर्डे, संजय ठाकरे, दीपक देशमुख, पोपट चौरे, मयूर भोये विलास निकम, राहुल भोईर, राजू जाधव, निवृती गातवे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तालुक्यातील आदिवासी समाजात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक जनजागृती करून समाज एकत्र करून यापुढे जो कोणता पक्ष व लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाचे प्रश्न शासन स्तरावर मांडेल किंवा आदिवासीवरील अन्याय अत्याचारास प्रतिबंध करेल अशा उमेदवारास आदिवासीचा पाठिंबा द्यायचे ठरले व त्याप्रमाणे तालुक्यात निवडणूक वेळी नियोजन देखील केले गेले. सोशलमीडियामूळे आता आदिवासी समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. बागलाण तालुक्यातील प्रत्येक गावात आदिवासी वस्ती आहे त्या प्रत्येक गावातील आदिवासी कार्यकर्ते एकत्र करून काँग्रेसचा जाहीरनामा मधील भागीदारी न्याय 5/6वी अनुसूचि, पेसा कायदा, याविषयी समजावून सांगण्यात आले.यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे दीपक मोरे,सोमनाथ तलवारे,नानाजी गातवे, गोविंद ठाकरे, पोपट पवार, सोनू माळी, कृष्णा पवार, सुरेश कापडणीस, बंटी मोरे, विजय पवार,दिपक गवळी,किशोर सोनवणे,एकनाथ सोनवणे,शंकर गायकवाड या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. आता 4 जूनला येणारा लोकसभेचा निकालच पुढील चित्र स्पष्ट करेल..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here