Home भंडारा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त’नागसेन’ ला मिळणार 70 डझन वह्या

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त’नागसेन’ ला मिळणार 70 डझन वह्या

37
0

आशाताई बच्छाव

1000417311.jpg

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त’नागसेन’ ला मिळणार 70 डझन वह्या

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थी, कर्मचारी व हितचिंतकांनी सुरू केलेल्या ‘मिशन-ए-पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या सकारात्मक कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीपती ढोले मुख्य प्रवर्तक या नात्याने संस्थेच्या नागसेन हायस्कूल व नागसेन प्रायमरी स्कूल च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करण्याचे आवाहन केले होत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आवाहन करताच खालील ट्रस्ट व व्यक्तींनी आपले दान जाहीर केले. जीवन सुक्षा हेल्थ केअर ट्रस्ट, नांदेड
40 डझन वह्या,
भारत कावळे (शिक्षक) माजी विद्यार्थी नागसेन हायस्कूल, नांदेड
10 डझन वह्या,
अशोक गोडबोले माजी विद्यार्थी पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय औरंगाबाद, 5 डझन वह्या,
डॉ. भारत वाठोरे, विभागीय कृषी अधिकारी, 5 डझन वह्या, अशा एकूण 70 डझन वह्या आज शुक्रवार दि. 31 मे 2024 पर्यंत जाहीर झाल्या आहेत. आणखी 15 पेक्षा जास्त दिवस आमच्या हाताशी आहेत. जून मध्ये शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी कमीत कमी 100 डझन वह्या व इतर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात पडावे असे आम्ही नियोजन करीत आहोत. विशेष म्हणजे रविवार दि. 2 जून 2024 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांचा
वाढदिवस आहे. “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं”
या गाण्याचे कवी मनोजराजा गोसावी आपल्या दुसऱ्या एका गीतात म्हणतात, “ज्याने चालाय तुम्हा स्वतःचे पाय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले?” खरोखरच हा एवढा मार्मिक प्रश्न आहे की, याचे उत्तर आम्हा कोणाकडेच नाही. आम्ही बाबासाहेबांना काहीच देऊ शकलो नाही. बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेला समाजाचा गाडा पुढे ओढण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही आमच्या शिरावर घेतली नाही. शेवटी ती जबाबदारी बाबासाहेबांच्या तिन्ही नावांनी आपल्या शिरावर घेतली. त्यापैकी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी चालवणे’ हा एक त्या गाड्याचा भाग आहे.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा गाडा ओढण्यासाठी ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांना ऊर्जा मिळावी म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इमारती विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या दिसल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण असेल तरच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा लोंढा येईल. म्हणून बाबासाहेबांना आपल्याला काही देता आले नाही तरी त्यांच्या नातवाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन या नात्याने वाढदिवसाची भेट म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दानाच्या रूपाने द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here