Home भंडारा मतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

मतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

42
0

आशाताई बच्छाव

1000413446.jpg

मतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा
पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दि.29 :19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदानाची मतमोजणी पलाडी Rdयेथे 4 जून रोजी सकाळी आठपासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाचा आढावा काल निवडणुक निणय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला.
काल सायंकाळी पाच वाजता झालेल्या या बैठकीस दोन्ही जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते.यावेळी पलाडी येथील स्ट्रॉगरूम बाजूला असलेल्या सभागहात मतमोजणी होणार असून 2000 अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या दिवशी विविध कामासाठी कार्यरत असणार आहेत.मतमोजणीला सकाळी आठपासुन सुरवात होईल.
यासाठी विधानसभा निहाय मतमोजणीसाठी कर्मचाऱ्याची बैठक व्यवस्था,सीसीटीव्ही तसेच संपुर्ण प्रक्रीयेची व्हीडीयोग्राफी होणार असून त्याबाबतीत सूचना जिल्हाधिका-यांनी दिला.
मतमोजणीच्या 21 फे-या होणार असून त्यामध्ये 14 टेबलवर मतमोजणी होईल.टपाली मतमोजणीसाठी 20 तर इटीबीपीएस मतमोजणीसाठी 14 टेबल असतील.
मतमोजणीसाठी सहायक निवडणुक निर्णय अधिका-यांची अधिनस्त कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअलमध्ये करून खात्री करून encore ॲपवर अपलोड करतील.ती माहिती थेट eci.gov.in या आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येईल.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रशीक्षण झाले असून त्यांना मतमोजणीच्या पासेस तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींनाही 31 मेपर्यत अर्जाव्दारे ओळखपत्र देण्यात येतील.
मतमोजणीच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पुरेश्या प्रमाणात औषध पुरवठा तसेच वैदयकीय मदत तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना दिल्यात.यावेळी पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून 1 जूनला मतमोजणी सभागहाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.सोबत मिडीया सेंटर तसेच संपर्क व्यवस्था,मतमोजणी प्रक्रीयेची गोपनीयतेबाबत आवश्यक त्या सूचना नोडल अधिका-यांना देण्यात आल्या.

Previous articleअमरावती शहरात सव्वातीन लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
Next articleपत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीत जबर मारहाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here