Home भंडारा रानावनात भटकंती करणाऱ्या पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी ठेवणे गरजेचे – पक्षी मित्र विलास...

रानावनात भटकंती करणाऱ्या पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी ठेवणे गरजेचे – पक्षी मित्र विलास केजरकर

55
0

आशाताई बच्छाव

1000413178.jpg

रानावनात भटकंती करणाऱ्या पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी ठेवणे गरजेचे – पक्षी मित्र विलास केजरकर

बेटाळा येथील बाल संस्कार शिबिरार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या चाऱ्या- पाण्याची सोय

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)– विद्यार्थ्यांच्या कोवळ्या बाल मनावर संस्कार होणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यासह विदर्भात उन्हाच्या दिवसात त्राही करून सोडणारा उन्हाळा आहे. आतातर नवतपा सुरू झाला आहे. मात्र मुक्या पक्ष्यांची वन भटकंती करणाऱ्या प्राण्याचे काय? हा प्रश्न घेऊन मुके पक्षी व प्राण्याकरिता मुठभर चारा व पाणी ठेवणे गरजेचे आहे. म्हणून एक घास चिऊताई साठी असे प्रतिपादन पक्षी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी केले.
ते ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित ग्रिष्मकालीन निःशुल्क बाल संस्कार शिबिर, शैक्षणिक व क्रिडा मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, ग्रिष्मकालीन निःशुल्क बाल संस्कार शिबिराचे कार्यकर्ते कार्तिक डोरले, अमिर शेख, महेंद्र राऊत, क्रिष्णा कमाने, अविनाश राऊत, क्रिष्णा कानेटकर, वासु कुंभलकर, शाहिणा शेख, शितल चौधरी, सुनिल समरित, चैतन्य ठोंबरे, अविनाश मंदुरकर, प्रशांत कुंभरे, सचिन पडोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. चांगले पाणी मिळाले तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित राहते. बऱ्याच वेळेस पाण्याअभावी पक्षी उडता- उडता खाली पडण्याचे प्रकारही घडतात. कोणत्याही ऋतूमध्ये विशेषत: उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये झाडाखाली ‘पाणथळे बनवावेत. तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी व थोडेसे दाणे ठेवावे, त्यांच्यासाठी घरटी बनवावे. असे मत शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांनी केले. तर मानवाला उपयुक्त असणारा ऑक्सिजन हा पक्ष्यांच्या माध्यमातून मिळत असते. कारण प‌क्षी हे फळ खातात, बियाणे सुध्दा पेरण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. मात्र आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष करत असतो. खरे वृक्षारोपणाचे कार्य करत असतात. असे प्रतिपादन ग्रिष्मकालीन निःशुल्क बाल संस्कार शिबिराचे कार्यकर्ते कार्तिक डोरले यांनी केले.
उपस्थितांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन संस्कार शिबिराचे महत्त्व व पक्षी बचाव यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राऊत व प्रास्ताविक कार्तिक डोरले यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. विधी बान्ते हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विधी बान्ते, श्रृती ईश्वरकर, लावण्या समरित, समिक्षा कुकडे, सर्वरी डोरले, शिवानी भोयर, आरूषी ईश्वरकर, रूद्र डोरले, तेजश्विनी ईश्वरकर, आदेश बान्ते, माही राऊत, सर्वरी ईश्वरकर, वंंशिका बोरकर, आकांक्षा हरकंडे, आरजू नेरकर, ऋतुजा बागडे, वंंशिका ईश्वरकर, चैताली नेरकर, मिनल समरित, श्रेया राऊत, धनश्री बुराडे, सानिया कुकडे, स्नेहा वनवे, सायना रामटेके, श्रीनिथी चरडे, शितल चौधरी, समिक्षा शहारे, अनुजा ईश्वरकर, नेहा जिभकाटे तसेच ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous articleकोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई विद्यालयाचा 97 टक्के निकाल—
Next articleकुणाचे हातपाय मोडले, कुणाचे डोके फुटले किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा एल्गार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here