Home गुन्हेगारी माहोरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

माहोरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

352
0

Yuva maratha news

1000404886.jpg

माहोरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
माहोरा/ प्रतिनिधी /मुरलीधर डहाके...सविस्तर वृत्त असे की जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार २५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जाफ्राबाद पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत रमेश सुरडकर (२७,रा.मातला ता.जि.बुलढाणा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
भागवत हा नऊ-दहा वर्षा पासून माहोरा येथे राहत होता. रेणुका टायर्स अँड वाशिग सेंटर येथे काम करत होता. शुक्रवारी रात्री दुकानावर तो एकटाच होता. यावेळी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान शेजारच्या नागरिकांना माहिती समजताच जाफ्राबाद पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मागदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक सखाहरी तायडे, बीट जामदार गजानन गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भगिले, कॉन्स्टेबल संदीप गवई यांनी घटनेचा पंचनामा करून तरुणाला माहोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉ.काटकर यानी त्याला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण आजुन समजू शकले नाही, जाफ्राबाद पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जामदार गजानन गावंडे करत आहे.

Previous articleफायनान्स कंपनीच्या कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला असता महिलेला अश्लील भाषेत केली शिवीगाळ….
Next articleमान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here