Home भंडारा भंडारा जिल्ह्यातील उन्हाळी परीक्षा 2024 च्या वेळापत्रकात बदल

भंडारा जिल्ह्यातील उन्हाळी परीक्षा 2024 च्या वेळापत्रकात बदल

198
0

आशाताई बच्छाव

1000373240.jpg

भंडारा जिल्ह्यातील उन्हाळी परीक्षा 2024 च्या वेळापत्रकात बदल

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी) मोटघरे महाविद्यालयातील परीक्षा उन्हाळी २०२४ ची कॉलेज ची उन्हाळी परीक्षा हि अशोक मोहरकर महाविद्यालय, अड्याळ येथे होईल .तर अड्याळ कॉलेज चे विद्यार्थी मोटघरे कॉलेज मध्ये परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील,तसेच काही अभ्यासक्रम ची परीक्षा मोटघरे कॉलेज चे विद्यार्थी शिवाजी सायन्स कॉलेज पवनी, ला परीक्षा देतील.विद्यापीठांनी श्री.भाऊराव पंचवटे यांच्या तक्रारीवर विद्यापीठांनी घेतलेल्या निर्णयामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या बहाद्दरवर दहशत पसरली असून या निर्णयामुळे नक्कीच उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारेल.अशी चर्चा भंडारा जिल्ह्यात सुरू झाली असून या निर्णयामुळे विद्यापीठाचे अधिकारी संचालक,सामान्य परीक्षा डॉ.प्रफुल साबळे यांचे स्तुती करण्यात येत आहे. तसेच डॉक्टर अरुण मोटघरे कॉलेज मधील कायम विनाअनुदानित अभ्यासक्रम ला एकही शासन मान्यताप्राप्त(विद्यापीठ मान्यताप्राप्त) शिक्षक नसल्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा ही यशवंतराव चव्हाण कॉलेज लाखांदूर व शिवाजी सायन्स कॉलेज पवनी ला होतील या विद्यापीठाच्या घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र विद्यापीठाचे कौतुक, स्तुती करण्यात येत आहे.

Previous articleपोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याची टाकी जवळ एकाचा खून
Next articleआता महावितरण ॲपमध्ये विजेचे अपडेट घरबसल्या मिळणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here