Home अमरावती वाहतूक पोलीस रस्त्यावर; १०५१ चालकांना ई चालान पोलीस आयुक्तांनी टोचले होते कान

वाहतूक पोलीस रस्त्यावर; १०५१ चालकांना ई चालान पोलीस आयुक्तांनी टोचले होते कान

78
0

आशाताई बच्छाव

1000369323.jpg

वाहतूक पोलीस रस्त्यावर; १०५१ चालकांना ई चालान पोलीस आयुक्तांनी टोचले होते कान
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलेल्या कान टोचणे व घेतलेल्या क्लास चा परिपाक म्हणून शहर वाहतूक विभागाकडून७ ते१५मे या कालावधीत विशेष मोहीम राबवली जात आहे.७ते११मे दरम्यान शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याकरता व वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या १०५१ चालका विरुद्ध ८.२१ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ७मे रोजी वाहतूक विभागाची बैठक घेतली. बैठकीदरम्यान शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षा व उपायोजना तसेच सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या संबंधाने वाहतूक विभागातील अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देऊन शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याकरता आवश्यक मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे व पोलीस निरीक्षक रिता उईके व संजय आढाव यांच्या नेतृत्वात वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात ७ते११मे दरम्यान६९० दुचाकी, १३५ कार, १४८ ऑटो, ४६ ट्रक चालकांना दंड करण्यात आला. मोहीम दरम्यान अपघातास कारणीभूत घटक भडगाव वेगाने वाहन चालविणे १३६, ट्रिपल सीट वाहन चालविणे १०४, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे २८, विनापरवाना अल्पवयीन ९, सिग्नल जम्प १६, विनाशीटबेल्ट४३, गौण खाली खणीज्याची असुरक्षित वाहतूक करणारे ट्रक १४ इत्यादी शीर्षकाखाली कारवाई करण्यात आली. मॉडीफाय सायलेन्सर लावलेल्या दोन दुचाकी वर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाहतूक विभागाद्वारे दररोज रात्री ८ते१२ दरम्यान विशेष नाकाबंदी राबविण्यात येत आहे. या दरम्यान ४५ पानावर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ७वाहन चालकाविरुद्ध ड्रिंक अँड ड्रायव्हची कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ दुचाकी चालक व एक ऑटो रिक्षा चालकाचा समावेश मी पर्यंत ही विशेष म्हणून राबविली जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्राणांकित अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक विभागात आवश्यक सहकार्य करावे.७ते१५मे या कलावती सुरक्षित वाहतूक व सुरक्षित अमरावती साठी विशेष मोहीम राबविली जात आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना रिता उईके पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली.

Previous articleपवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव मशानभूमी जवळ मजूर नेणारे वाहन पलटले , तब्बल 27 मजुर जखमी…
Next articleजागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here