Home सामाजिक आजच्या तापमानाची दिशा बघता झाडे लावणे काळाची गरज आहे देशातील प्रत्येक नागरिकाने...

आजच्या तापमानाची दिशा बघता झाडे लावणे काळाची गरज आहे देशातील प्रत्येक नागरिकाने किमान_एक झाड लावावे….दिपक जाधव_

69
0

आशाताई बच्छाव

1000303324.jpg

आजच्या तापमानाची दिशा बघता झाडे लावणे काळाची गरज आहे देशातील प्रत्येक नागरिकाने किमान_एक झाड लावावे….दिपक जाधव_

वासखेडी – येथील आजच्या ४० ते ४५ डिग्री तापमानाची तीव्रता वाढत जात असुन पुढील तापमानाची दिशा बदलविण्याकरीता झाडे लावणे हाच एक उपाय असुन निसर्गाच्या सानिध्यात जर पुढील पिढीला वाचवायचे असेल तर प्रत्येकाने झाडं लावणे ही सवय आपल्या अंगी जोपासली पाहीजे,जसे की आपण आपल्या शरीराची काळजी घेतो,तशीच काळजी लावलेल्या वृक्षांची देखील घेतली पाहिजे,आपण संजीव आहोत,पण सगळी कला ही निर्जीव घटकांमध्ये खुपचं मोठी आहे,तेच आपल्याला जीवनातील जगण्याची ताकद निर्माण करून देतात, निसर्ग आपल्याला, हवा,पाणी,आक्सिजन,शरीरासाठी आवश्यक असणारी सगळी,कार्य करतात तर मग आपण झाडांची लागवड का करू नये?असा प्रश्न उपस्थित होतो, पाण्याची पातळी कमी होते,उन्हाळयाची तीव्रता, हिवाळ्यात थंडीची कमतरता,अवकाळी पाऊस,हीच या वृक्षाची कमतरतेमुळे होणारे परिणाम आहेत, वृक्षांची लागवड करणे हीच पुढील काळची अत्यंत महत्वाची गरज आहे, जंगलात झाडी कमी झालीत, म्हणुन मानवी वसाहतीत जंगली हिंस्र प्राण्यांनी प्रवेश केला, वृक्षांची लागवड केली तर नक्कीच देशात कुठलीही आपत्तीजनक संकटे येणार नाहीत यात कुठलीही शंका नाही? जंगल वाचवा,जंगल वाढवा, शासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,खरे बघता झाडांची तस्करी ला कायदा आहे पण तो केराच्या टोपलीत आहे,त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतांना कुठेही दिसत नाही,आज झाडांची होणारी कत्तल दिवसाढवळ्या होते,तरी देखील शासनाची कुठल्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही, म्हणुनच एक झाड लावावे साधु संतांनी देखील झाडांकरिता जनजागृती केली आहे तर आपण देखील का करू नये, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील झाडांची माया बघता अभंग या देशातील देशावाशियांकरिता लिहीला आहे “वृक्ष वल्ली आम्हां सोयरी,वनचरे” वृक्ष हे आपले सकल जगातील मानवांचे संगे सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत,त्यांचा आपण आदर केला पाहिजे,जेणेकरून आपल्यातीलच एक जीव नक्कीच वाचेल हीच खरी या निसर्गाची खरीखुरी ताकद आहे,आजच प्रतिज्ञा करा निसर्ग वाचला तर नक्कीच देश, “एक झाड एक परीवार” देशातील मानव,प्राणी,हवा,पाणी हे नक्कीच भरभराटी ने नांदतील , आपल्या मुलांची जबाबदारी आपण जशी पाळतो,तशीच जबाबदारी आपण एका झाडाची पाळायला हवी, झाडाला देखील परीवारातील सदस्यांचा दर्जा द्या, जेणेकरून झाडाचे संगोपन होईल,तेच एक झाड नक्कीच मायेची सावली देणारी आपली निसर्गाच्या सानिध्यातील खरी ताकद निर्माण करून एक आदर्श देईल,झाडे ही आपल्या जीवनातील अनमोल हीरा आहे,जो नेहमीच चकाकणारे दिव्य दृष्टीचा आधार स्तंभ आहे,पुढील निसर्गाची दिशा बदलविण्याकरीता झाडे लावणे हाच एक उपाय आहे, अभिमानाने सांगतो की या आपल्या देशासाठी, त्या मातीसाठी,पशु,पक्षांकरिता,मुक्या प्राण्यांच्या जीवांना करिता,आणि आपल्या परीवारासाठी, देशवासीयांना जीवदान देण्यासाठी जर का आपण एक झाड लावले तर नक्कीच आपण या जगातले सर्वात मोठे योगदानाचे खरे साक्षीदार असल्याचा वंदनीय महान कार्याचे खरे साक्षीदार राहणार..
झाडांचे नुकसान,व महत्त्व हे आजच्या तापमानाची तीव्रता बघुनच करता येईल, झाडांमुळे महामारी सारखे प्रसंग आपण हाताळलेले असतांना देखील वृक्षांचे संवर्धन होत नाही परंतु र्हास मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे,याला मानवच कारणीभुत आहे, आपल्या जीवनातील असंख्य संकटे ही निसर्गावर अवलंबून आहेत,करोना काळात आक्सिजन करिता किती जीवांचे बलीदान झाले, झाडांमुळे आक्सिजन मिळतो तरी देखील कुणीही या झाडांची किम्मत करत नाहीत,पाऊस का चांगला होत नाही? नदी,नाले तलावात पाणी पुरवठा का होत नाही? हवामान का बदलत नाही?अवकाळी पाऊस का होतो? महामारी सारखे प्रसंग का येतात? जंगलातील प्राणी जंगलातच का राहत नाही?पशु पक्षांची झाडावरची घरटी कुठेही दिसत नाही? पहाटेच्या वेळी चिमण्यांची किलबिलाट का दिसत नाही?या. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवुच शकत नाही कारण आपण कधीही झाडांची व्याख्याच पाहीली नाही, म्हणुन मी दिपक जाधव समस्त देशवासीयांना विनंती करतो की जर पुढील पिढीला वाचवायचे असेल तर नक्कीच देशातील प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की,आपण एक झाड, लावावे जेणेकरून आपल्यातीलच एक आदर्श जीव नक्कीच वाचेल हीच अपेक्षा बाळगतो..

Previous articleयुवा मराठा न्यूज चैनल एक आधारस्तंभ.: अजय थोरात.
Next articleव-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेची चालढकल; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा – राजेंद्र पाटील राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here