आशाताई बच्छाव
भिमा नदीकाठावरील 3 फ्युज लाईट 8 तास तात्काळ चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप
माळशिरस,
भिमा नदी काठावरील लाईट हे 1 एप्रिल 2024 रोजी काही ठिकाणी 4 तास आणी काही ठिकाणी 2 तास असे प्रमाणात लाईट जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने केली आहे त्यामुळे शेतकरी अधीच दुष्काळामुळे मेटाकुटीस आला आहे आणी आता लाईट बंद केल्यामुळे आहे हे ही शेतातील पिके जळून जाऊन शेकऱ्यांन समोर आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्या कृषि प्रधान देशात शेतकऱ्यांची लाईट बंद करून जर शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास जिल्हाधिकारी प्रवृत्त करत असतील तर ह्या हुन दुर्दव्याची गोष्ट नाही. भिमा नदी काठावर माळशिरस तालुक्यात कोणत्याही प्रकारचे पाणी पुरवठा योजना नाहीत किंवा दुष्काळ साठी कोणत्याही प्रकारचे पाण्याचे ट्यान्कर चालू नाहीत त्यामुळे भिमा नदी मध्ये जे शिल्लक राहणारे पाणी हे भाष्पीभवन ने उडून जाऊ शकते त्यामुळे कमीत कमी ते पाणी शेतकऱ्यांच्या उपयोगी तरी यावे या साठी भिमा नदी काठ तात्काळ 8 तास विद्युत पंपाची लाईट चालू करावी ही आपणास विनंती अन्यथा माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उग्र स्वरूपास प्रशासनास समोरे जावे लागेल याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल.आणि या आंदोलनास माळशिरस,पंढरपूर नदी काटच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन उपस्थिती दर्शविन्यात यावी असे आव्हान युवा सेना जिल्हा प्रमुख सोलापूर पंढरपूर विभाग श्री.गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली निवेदन देण्यात आले आहे.