आशाताई बच्छाव
महिला भारत देशाच्या विकासाचा महत्त्वाचा स्तंभ-
भाजपा जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ स्मिताताई कुलकर्णी
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
महिला शक्ती वंदन कार्यक्रम संपन्न 2024 या वर्षात केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा आर्थिक स्तर सक्षम झाला पाहिजे. यासाठी विविध माध्यमातून महिला उत्कर्ष सन्मान योजना प्रत्येक घरातील महिलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण हे केवळ बोलण्यातून नसावे तर ते कृतीतून असावे महिला या देशाचे विकासाचे महत्त्वाचा स्तंभ आहे त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होणे गरजेचे आहे असे मनोगत भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रत्येक बचत गट स्वयंसहाय्यता समूहास 15000 (आर एफ) म्हणजे खेळते भांडवल वाटप करण्यात आले. काही समूह ग्रुपला दोन ते पाच लाखांपर्यंत खेळते भांडवल दिल्याने अतिशय समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. या भांडवलातून उद्योग व्यवसायासाठी हातभार लागणार असून भविष्यात याहीपेक्षा जास्तीचे खेळते भांडवल उपलब्ध होईल याची त्यांनी खात्री दिली. महिला बचत गट ही केवळ कोणतीही राजकीय वोट बँक नसून महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे समाजाचा मूलभूत पाया महिला असतात. त्यांचा उत्कर्ष होणे यासाठी अशा बचत गटांची स्थापना जास्तीत जास्त होणे गरजेचे असून गट वाढीसाठी लागणारे सर्व परी प्रयत्न केले जातील असे मनोगत ज्ञानेश्वरी गटाच्या अध्यक्षा अक्षदा जोशी यांनी केले. भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा सोनालीताई राजे पवार यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक ठिकाणी शक्ती वंदन साजरे करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजना लेक लाडकी योजना, समृद्धी कर्ज योजना, पगार प्रसूती रजा 12 ते 26 आठवड्यापर्यंत, पी एम मातृ वंदना योजना, जन धन योजना, आयुष्मान भारत योजना, सौभाग्य योजना,लेक लाडकी योजना अशा योजनांचे फ्लेक्स बनवून महिलांनी परिसरात पदयात्रा करीत नारी शक्ती संवाद साधला सदरील कार्यक्रम लासलगाव मंडल येथे घेण्यात आला यावेळी प्रत्येक बचत गटाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, अक्षदा जोशी, खुशी आब्बड, रुबीना बागवान, अनुराधा बाफना, मनीषा जाधव, सोनाली कर्डिले, अर्चना आहेर, सुरेखा आरगडे, तसेच प्रत्येक गटाच्या सचिव स्वाती जोशी, प्राजक्ता भंडारी, मोनिका दिंडोरकर, वंदना अहिरराव, रजनी कुलकर्णी, अनिता जाधव, शोभा कर्पे, सुवर्णा, आहेर व बचत गट समूहातील सर्व महिला उपस्थित होत्या.