आशाताई बच्छाव
अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटकच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम व मराठी भाषिक कवी संमेलन संपन्न
बिदर जिल्हा नुतन पदाधिकारी ,कमलनगर तालुका नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न
संजीव भांबोरे
कर्नाटक_ (बसवकल्याण) अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेश च्या वतीने मराठी भाषा गौरवदिनानिमित्त अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटक बिदर जिल्हा,कमलनगर तालुका पदाधिकारी ,पदग्रहण सोहळा व मराठी भाषिक कवी संमेलन कार्यक्रम दिनांक 3 मार्च 2024 ला सरकारी माध्यमिक शाळा बसवकल्याण बिदर येथे संपन्न झाले. यावेळी अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सुप्रसिद्ध कवी,लेखक सुर्यकांत संभाजी ससाने तळभोकर यांनी अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या स्थापने मागील भूमिका विषद केली व कर्नाटक मधील मराठी भाषिकांसाठी सोबतच नवोदित कवी ,लेखक ,साहित्यिक ,पुस्तक प्रकाशक यांना हक्काचे राष्ट्रीय विचारपीठ उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला व बिदर जिल्हा व कमलनगर तालुका नुतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करुन साहित्यसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिताताई सावळकर,उद्घाटक सूर्यकांत मदकटटे बसवकल्याण उपस्थित होते. प्रमुख भाष्यखार प्रा. विनोद देवलकर उमरगा,मुख्य अतिथी म्हणून प्रा.शैलेश महामुनी उमरगा,मोहनराव कोरे देवनाळ ,इंदुमती सुतार बिदर व सुर्यकांत ससाने तळभोकर राज्याध्यक्ष अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटक हे उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम ज्ञानपिठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. स्वागत गीत लक्ष्मीबाई पाटील रिटायर्ड एच. एम. बसवकल्याण यांनी गायीले. प्रार्थनागीत प्रभावती सुर्यवंशी तळभोग यांनी गायिले.प कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण सूर्यकांत ससाने तळभोगकर अध्यक्ष अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटक यांनी केले. सूर्यकांत ससाने तळभोगकर व उपस्थित मान्यवरांनी बिदर जिल्हा व कमलनगर तालुका नुतन पदाधिकारी यांना अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद चे वतीने नियुक्तीचे पत्र देण्यात आले.नुतन पदाधिकारी नियुक्त्या अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आली. मराठी भाषिक कविसंमेलनात आनंद जाधव घाटबोराळ,सतिश सावळे कमलनगर,रविदास कांबळे कुरुबखेळगी,गोविंदराव चिटंपल्ले जोगेवाडी, मिलिंद शिंदे कमलनगर यांनी कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बजरंग कांबळे वांजरखेडा यानी केले तर आभार प्रदर्शन अशोकराव पाटील चांडेष्वर यांनी केले. अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याच्या नवनियुक्त बिदर जिल्हा व कमलनगर तालुका सर्व पदाधिकाऱ्यांचे ,सदस्यांचे नियुक्तीसाठी व पुढील साहित्यसेवेच्या वाटचालीसाठी अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख संजीव भांबोरे यांनी अभिनंदन केलेले असुन शुभेच्छा दिल्या आहेत.