आशाताई बच्छाव
आजची हिच ती कोजागिरीची काळी रात्र..!
संपूर्ण महाराष्ट्र हादरला मोठया हत्याकांडाने…!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव- आज कोजागिरी पोर्णिमा.बरोबर आजच्याच दिवशी २७ वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.
नाशिकच्या मालेगाव शहराजवळील सोयगांव सब स्टेशन जवळील बंगल्यात सन १९९६ साली हे हत्याकांड घडले होते.संपतीच्या वादातून सख्खा भाऊ कसा वैरी होतो हे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले होते.सोयगांवच्या सब स्टेशन रोडला कृषी अधिकारी एस.डी.पाटील यांचा परिवार शेतात बंगला बांधून आई केशरबाई पाटील यांच्या समवेत राहत होता.केशरबाई पाटील यांना अजून एक प्रकाश नावाचा सावत्र मुलगा होता.पण तो नाशिकला दिंडोरी रोडवरील मेरीला राहून कसेबसे आपले कुटूंब सांभाळत होता.आणि सावत्र भाऊ एस.डी.पाटील आपल्याला आपल्या शेतीत व संपतीत वाटा देत नाही,म्हणून प्रकाश पाटीलने आपल्या मुलांच्या संगनमताने भयानक असे कटकारस्थान रचले.कोजागिरी पौर्णिमेला एस.डी.पाटील यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाश पाटीलच्या मुलाने मालेगावी काका एस.डी.पाटील यांच्या घरी सब स्टेशनजवळ भेट दिली.व वाढदिवस रात्रीचा असल्यामुळे तेथेच मुक्कामाचा बहाणा करुन थांबला.कोजागिरीच्या मध्यरात्री सगळे पाटील कुटूंबिय गाढ झोपलेले असताना,प्रकाश पाटील यांच्या माथेफिरु मुलाने डबल बोर बंदुकीतून गोळ्या झाडून आजी केशरबाई पाटील,चुलती पुष्पा पाटील ,चुलता सुपडू पाटील,आणि चुलत भाऊ व दोन चुलत बहिणी अशा सहा जणांची निघृर्णरित्या हत्या करुन संपतीत वाटा देत नाही म्हणून असा बदला घेतला.पुढे या गुन्ह्याचे प्रकरण अनेक वर्ष चालले.त्याला आता २७ वर्ष झालीत.एस.डी.पाटील यांचा सब स्टेशनजवळील बंगला आजही निर्जन व ओसाड पडलेला आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सहा खुन बघणारा हा बंगला या घटनेचा मुक साक्षीदार म्हणून बेवारस अवस्थेसारखा पडला आहे.मात्र दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला या बंगल्यात झालेल्या निर्घृण हत्याकांडाने आजही अंगावर शहारे येतात.अन साहजिकच त्या कोजागिरीच्या काळ्या रात्रीच्या स्मृती जाग्या होतात.