आशाताई बच्छाव
अवयवदान : श्रेष्ठतम दान !
निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत. मात्र मृत्यूनंतर जाळून किंवा पुरून हे अनमोल अवयव नष्ट केले जातात. हा कुठला धर्म आहे? त्यापेक्षा आपल्या शरीरातील ही निसर्गाची भेट इतरांना दिली तर अवयवांची प्रतीक्षा करणाºया अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात आणि मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपात इतरांमध्ये जिवंत राहिले जाऊ शकते. हा विचार स्वत: अवयवदानाची शपथ घेऊन स्वप्निल देशमुख हे नाव फार परिचित नसले तरी त्यांनी घेतलेला संकल्प मोठा प्रेरणा देणारा आहे.
अवयवदानाची स्वत:च्या शरीरातील अवयव दान करण्याची शपथच घेतली.
Notto,राष्ट्रीय अंग और ऊतक प्रत्यारोपण संगठन
च्या माध्यमातून मेंदूमृत अवस्थेत नेत्रदान, अवयवदान आणि मरणोत्तर देहदानाचे स्वेच्छापत्र भरून घेतले.
शरीरातील अवयव मौल्यवान निसर्गाने मोफत दिलेली भेट आहे. त्यामुळे ही भेट आपण फार तर शेअर किंवा अर्पण करू शकतो, मेंदूमृत झालेली व्यक्ती फार तर दोन-चार दिवस जगू शकते व मृत्यू अटळ आहे. त्यावेळी त्याच्या शरीराचे अवयव चांगल्या स्वरूपात असतात. अशावेळी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तर गरजू व्यक्तींना फायदा होऊ शकतो. शरीरातील किडनी, यकृताचा भाग, हृदयाचे व्हॉल्व, आतडे, डोळे, स्कीन आदी आठ अवयव दान केले जाऊ शकतात. त्यामुळे इतर आठ व्यक्तींच्या शरीरात अवयवांच्या रूपात मृत व्यक्ती जिवंत राहू शकते.अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यक भारतात लोक अवयव घेण्यासाठी उत्सुक असतात, मात्र देण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे देशात अवयवांची गरज असलेल्यांची प्रतीक्षा यादी फार मोठी आहे. त्यापेक्षा परदेशात रुग्णालयातील डॉक्टर निर्णय घेऊन मेंदूमृत व्यक्तींचे अवयव इतरांना दान करतात. त्यामुळे स्पेन, अमेरिकेसारख्या प्रगत देशात गरजूंची प्रतीक्षा यादी नाही. भारतात मात्र मृत्यू होईपर्यंत प्रतीक्षा केली जाते व नंतर देह जाळल्या जातो. आपल्याकडे अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यक आहे. नातेवाईकांनी सकारात्मक निर्णय घेतला तर आपला प्रिय व्यक्ती ते इतरांमध्ये बघू शकतात. हे उदात्त दान म्हणजे मृत्यूनंतरही टिकणारी निरपेक्ष मैत्री होय असे वाटते
मरावे परी ‘अवयव’रूपी उरावे
✍🏻स्वप्निल देशमुख ( पत्रकार)