Home भंडारा कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने “महाआरोग्य शिबिर 2023” संपन्न ‘

कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने “महाआरोग्य शिबिर 2023” संपन्न ‘

55
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231011-061150_WhatsApp.jpg

कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने “महाआरोग्य शिबिर 2023” संपन्न ‘

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )वर्षभर विविध सामाजिक कार्य करणारे कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने नेत्रदीपक “महाआरोग्य शिबिर 2023″ संपन्न. दिनांक ०७/१०/२०२३ रोज शनिवारला भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘महात्मे ऑय केअर नागपुर’ यांच्या सहयोगातून एकूण ६७३ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतियाबिंदु ऑपरेशन, रक्तदान शिबिराअंतर्गत एकूण 30 जणांनी रक्तदान केले. तर मोफत बीपी, शुगर, थायरॉईड, दंत तपासणी शिबिरांतर्गत एकूण 300 लोकांची तपासणी करण्यात आली. सहयोग हॉस्पिटल गोंदिया च्या मदतीने मोफत हृदय तपासणी, ईसीजी व दंत तपासणी लहान वयोगटातील मुलांचे मोफत आरोग्य तपासणी. तद्नंतर लगेचच भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार मा. सुनीलजी मेंढे यांच्या निधि अंतर्गत कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या समाज भवनात स्वच्छतागृह बांधकामा करिता २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेल्या कामाचे “भूमिपूजन” करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या, व अनेकांच्या उपस्थितीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पन झाले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सुनीलजी मेंढे खासदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजुभाऊ कारेमोरे, प्रमुख विशेष अतिथी मा. मधुकरजी कुकडे माजी. खासदार, मा. नानाभाऊ पंचबुधे मा. मंत्री, मा. भाउराव तुमसरे मा. सभापती, मा. नारायणरावजी तितिरमारे संस्थापक, मा.दिलीप सार्वे जी.प. सदस्य, मा. देवाभाऊ इलमे जी.प. सदस्य, मा. नरेशजी ईश्वरकर जी.प. सदस्य, मा. एकनाथजी फेंडर जी.प. सदस्य इत्यादींच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात प्रस्तुत कार्यक्रम पार पडला. समाज बांधव श्री. किशोरजी चौधरी, आशीषजी कूकडे, गोपालजी ठवकर, योगेशजी सिंगंजुडे, शरदजी तितिरमारे, सुधाकरजी कहालकर, सेवकजी कुथे, नितिन धांडे, प्रवीण कहालकर, जयंत पंचबुधे, किशोर बोन्द्रे, राजकुमारजी चौधरी, दामोदर डहाळे, जगेश्वर अस्वले, राकेश धार्मिक, कौतुका ताई सारवे,उषाताई कुकडे, कविता कुकडे,शिलाताई डोये,, अश्विनी ताई ठवकर, रुखमाबाई धांडे परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने “महाआरोग्य शिबिर 2023” यशस्वी झाला. सर्वांचे कुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने मनःपूर्वक आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here