आशाताई बच्छाव
भिलखेडा येथे सामाजिक सुरक्षा सहाय्यता व मार्गदर्शन शिबीर संपन्न
युवा व युनिसेफ संस्थेच्या सामाजिक सुरक्षा प्रकल्पाचे आयोजन
चिखलदरा प्रतिनिधी
नागेश धोत्रे
युवा मराठा वृत्तसेवा
चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागात युवा व युनिसेफ संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकातील गरजु व दुर्बल कुटुंबातील लोकांना शासनाच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना व उपक्रमाची जनजागृती करत लाभ मिळवून दिला जातो. त्याअंतर्गत आडनदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भिलखेडा येथे सामाजिक सुरक्षा सहाय्यता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
चिखलदरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील लोकांना सहायता व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करून दर महिन्याला एकेक ग्राम पंचायत मधील वंचित घटकातील गरजु व दुर्बल कुटुंबातील लोकांसाठी सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत वृध्द लोकांना महसुल विभाग मधुन श्रावण बाळ निराधार योजना, रेशन कार्ड योजना, महिला व बाल कल्याण विभाग मधुन माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी संच किट, बाल संगोपन योजना, अमृत आहार योजना, आरोग्य विभाग कडून मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजना तसेच आधार कार्ड अपडेट व मोबाईल क्रमांक लिंक, नरेगा मध्ये खोदकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोंदणी व योजनेचा लाभ, कृषी विभागाच्या विविध योजना यासोबतच इतर योजना बाबत गाव निहाय मार्गदर्शन व जनजागृती युवा संस्थेच्या वतीने करण्यात येत असुन गरजु व वंचित घटकातील लोकांसाठी शिबीराचे आयोजन करुन योजनाची माहिती देऊन योजना पात्र लाभार्थ्यांसाठी गाव तिथे शिबीर चे आयोजन करून ऑनलाईन-ऑफलाईन प्रक्रिया करुन देण्यास मदत होत आहे.
भिलखेडा येथे आयोजित शिबिरात शासनाच्या सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात आला. यामध्ये शासनाच्या आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, श्रावणबाळ योजना, निराधार योजना, बँक खाते, माझी कन्या भाग्यश्री योजना, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी, पि.एम.किसान सन्मान निधी योजना चे नोंदणी व KYC व इतर योजनेची ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली. या शिबिराचे आयोजन संस्थेचे शुभम काजे यांनी केले होते तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र संचालक सुमित काजे, आशा सेविका भुरी तोटे, रोजगार सेवक राजु मावस्कर व गावातील इतरांच्या सहकार्यातून शिबीर संपन्न झाले