राजेंद्र पाटील राऊत
संपादकीय अग्रलेख…
व-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी -भाग ३
धाडसी दळवी ताईंना मानाचा सलाम…! तर सौ चुह्है खाके बिल्ली चली हज को!!
वाचकहो,
व-हाणे प्रकरणाची खरी सुरुवात सन २०२० मध्येच झाली.तेथील जागा प्रश्नावरुन ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांनी हे रणकंदन माजविले.अगोदर युवा मराठा परिवाराच्या पाणपोईला जागा देऊन स्वतः चे उदघाटन करणे आणि ती जागा युवा मराठा परिवाराच्या नावे करुन देण्यासाठी रोख पन्नास हजार रुपये घेणे,हे सगळे रामायण सुवर्णा सांळुखे यांनी आपल्या व-हाणेतील कार्यकाळात अगदी बिनदिक्कतपणे केलेत.मात्र नंतरच्या काळात ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनी घुमजाव करत “तो मी नव्हेच” ची भुमिका जागा प्रश्नातून सहिसलामत अंग झटकण्याचा प्रयत्न केला खरा,पण तो नंतरच्या काळात दिवसेंदिवस सुवर्णा सांळुखेंच्याच अंगलट येत गेला.
व-हाणे प्रकरणातील जागा प्रश्नावरुन सुरु झालेले हे रणकंदन विविध आंदोलनाच्या रुपाने संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत व चर्चत असताना,यानिमिताने व-हाणे ग्रामपंचायतीचे अनेक खोटे -नाटे,लांडयालबाडींचे उद्योग चव्हाटयावर येत राहिले.जेथे आभाळच फाटले तर ठिगळं तरी कुठे कुठे लावायचीत?असा यक्ष प्रश्न व-हाणे ग्रामपंचायतीबाबत प्रशासनापुढे उभा ठाकला असतानाच (अ) कार्यक्षम ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे या युवा मराठाच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव या विधवा व निराधार महिलेच्या घरी गावातील सडकछाप पुढाऱ्यांना घेऊन जाऊन “तुम्ही मला कधी पन्नास हजार रुपये दिलेत” चला देवावर हात ठेवा.वगैरे सारखे आकांडतांडव करुन “मी नाही त्यातली” असे केविलवाण्या स्वरुपात साव बनून आव आणण्याचा प्रयत्न केला.असो,प्रस्तुत अग्रलेखाचे तात्पर्य एव्हढेच की,आम्ही स्वतः काचेच्या घरात राहत असताना दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकण्याचा उपव्द्याप करु नये,असा प्रकार कधी कधी आपल्याच अंगलट येतो याची जाण बहुतेक ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना नसावी? व-हाणे प्रकरणात आंधळ दळतं कुत्र पीठ खातं अशी भयानक अवस्था झालेली असताना प्रशासनाला सगळे उघडया डोळ्यांनी दिसत असतानाही प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी भरत वेंदे या प्रकरणात मुग गिळून गप्प बसलेत.व मौन धारण केल्याप्रमाणे लबाड व भामटयांचे व खोटे धंदे करणाऱ्यांचे वेंदेच्या आशिर्वादाने चांगभले सुरु आहे.
खोटे व लबाडीचे कामे करणाऱ्या भामटयांनी कितीही देव -देव केला तरी अल्ला त्यांना पावणार नाही.आणि शंभर उंदीर खाऊनही हज त्यांना पावन होणार नाही.अर्थातच सौ चुह्हे खाके बिल्ली चली हज को असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरु नये..
४ आँक्टोबर २०२१ रोजी व-हाणे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेला प्रत्यक्ष पाच सदस्यच गायब राहून प्रोसिडींग बुकात त्यांच्या कुठल्याही सहया नसतात,तरी त्यांनी दिलेल्या जबाबाप्रमाणे आम्हांला सहया करण्याची आठवण राहिली नाही.हे सांगणे म्हणजे पोरकटपणाचे लक्षण असून,प्रशासनाची बेअब्रु चव्हाटयावर आणण्याचा हा अत्यंत नीच पातळीवरचा प्रयोग आहे.आम्ही ग्रामसभेला होतो पण सहया करण्याचा विसर पडला असा जबाब एका जबाबदार अधिकाऱ्यांला देणे म्हणजे हा लोकशाहीचा क्रुर अपमान व थट्टा ठरते,ग्रामसभेला होते मग सहया करु नयेत म्हणून कुणी धमकी दिलेली होती काय? किंवा कुणी ब्लँकमेल केले होते का? की सहया करण्याचा विसर पडावा म्हणजे हि ग्रामसभा गांजा व भांग सेवन करुन आयोजीत केलेली होती काय? याचा सखोल खुलासा मात्र खोटे करणाऱ्यांनी केला नाही विशेष! याचा साधे तरी अवलोकन उच्च पदस्थ अधिकारी भरत वेंदेनी करुन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करुन खोटे जबाब सादर करणाऱ्यांनी सहया करण्याचा विसर पडला हे सांगणे हास्यास्पद असले तरी ग्रामसभेला पोरखेळ समजून शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेसह सरपंचावर कायदेशीर कार्यवाही करावीच.जेथे ४ आँक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेला हजर होतो पण सहया करण्याचा विसर पडला हे सांगणाऱ्यानी अगोदर आपण सुवर्णा सांळुखे सोबत ज्या विधवा व निराधार महिलेच्या घरी जाऊन देवावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगण्यासाठी दबाव टाकत होतो.आता तीच वेळ आपल्यावर आली आहे,आपण जर खरोखरच ग्रामसभेला हजर होतात,अन सहया करण्याचा विसर पडला तर आपणही देवावर हात ठेऊन शपथ घ्यायला कुठलीच अडचण नाही.पण…देवसुध्दा या अशा लबाडांचे पाप आपल्या माथी मारुन घ्यायला रिकामा नाही.कारण चार सदस्य जरी बोलत असले आम्ही हजर होतो पण सहया करायचे विसरलो.तर त्याचाही पर्दाफाश स्वाभिमानी व एकनिष्ठ असलेल्या आदिवासी भिल्ल जातीतील चंद्रकलाताई दळवी यांनी खोटयाचा बुरखा वेशीवर टांगला आहे.ग्रामसभेला हजरच नव्हतो तर सही करणार कशी? या दळवीताईंचा रोकडा सवाल खुप काही सांगून जातो.आम्ही सलाम करतो दळवीताईंच्या धाडसाला खोटयांची साथ न देता सत्याच्या पाठीशी उभ्या राहिल्यात..असो,एक खोटं करण्यासाठी शंभरदा खोटं कराव लागते आणि शेवटी तेच अंगलट येते याचे साधे भान व-हाणेतील अतिहुशार राजकारण्यांना येऊ नये म्हणजे हे अतिच झाले! त्यामुळेच मांजराने कितीही उंदीर मारुन खाल्ले अन शेवटी देव -देव करण्यासाठी हजला गेला तरी तो बिच्चारा अल्ला यांचे पाप आपल्या माथी थोडेच मारुन घेणार आहे.याचीच जाण आता खोटे धंदे करणाऱ्या भामटयांना वेंदेनी पाठीशी घालून पाठबळ देऊ नये म्हणजे हा लेख लिहण्याचे सार्थक होईल.एव्हढेच!