आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
मालेगांवी बी.डी.ओ.च्या दालनात होणार मौन धारण आंदोलन २४ आँगस्टपासून
(प्रतिनिधी विजय चांदणे)
मालेगांव- व-हाणे प्रकरणात ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन लिखित आश्वासन देऊनही त्याची अद्याप परिपुर्ती करण्यात न आल्याच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी (दि.२४ आँगस्ट) पासून युवा मराठा महासंघाचे मौनधारण आंदोलन सुरु केले जाणार आहे.
याबाबत सविस्तर असे की,व-हाणे प्रकरणातील खोटया व बनावट सहया करणाऱ्या विरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन बोगस व खोटी ग्रामसभा घेऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या सरपंचाला पदावरुन अपात्र करण्याची त्वरीत अंमलबजावणी व्हावी शिवाय कलम ३९ नुसार ग्रामसेविकेविरुध्द कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची तडकाफडकी कार्यवाही व्हावी,म्हणून मागील महिन्यात युवा मराठा महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडले होते.त्याचवेळी गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी लेखी आश्वासन देताना एक महिन्यात कार्यवाही करण्याचे लेखी देऊनसुध्दा या प्रकरणात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत हे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते ५ मौन धारण आंदोलन करणार आहेत.तोंडाला काळा कपडा बांधून व गळ्यात प्रशासनाचा निषेध करणारा फलक अडकवून हे अनोख्या पध्दतीचे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत दररोज कार्यालयीन वेळेत केले जाणार आहे.तसे सबंधिताना निवेदनाव्दारे पुर्वसुचीत करण्यात आलेले आहे.