आशाताई बच्छाव
लासलगांवचे डाँ अमोल शेजवळ मुळव्याध,भगंदर रुग्णांसाठी ठरलेत देवदुत!
देव नक्कीच कुणी पाहिलेला नाही.पण..डाँक्टराला देवाचा दुसरा अवतार म्हणूनही बघितले जाते.आज अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना जेव्हा देवदुताच्या रुपात डाँक्टर भेटतात तेव्हा खरोखरच त्यांच्या कर्तव्यांचे कौतुक करावेसे वाटते.तस बघितले तर बहुतांशी ठिकाणी डाँक्टर हे फक्त पैसे कमविण्याचे ठिकाण म्हणून लोकात समज निर्माण होत असताना,त्यास अपवाद म्हणून की काय? नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरात डाँ.अमोल भास्करराव शेजवळ हे मुळव्याध व भगंदर सारख्या अतिगंभीर आजारावरील रुग्णांसाठी देवदुत म्हणून सर्वपरिचीत होत आहेत.अनेक ठिकाणावर हिंडून फिरुन येणारे रुग्ण जेव्हा डाँक्टर शेजवळ यांच्या जिवक रुग्णालयात येतात तेव्हा त्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरमसाठ व अफाट खर्च न सांगता डाँक्टर शेजवळ हे मायेने व प्रेमाने सुस्थितीत माहिती देऊन रुग्णाला दिलासा व हिंमत कसा देता येईल याचीच खरे तर मानवतावादी दृष्टीने उपचार पध्दती सुरु करतात.अगदी गरीबातल्या गरीब रुग्णाला सुध्दा डाँ.शेजवळ हे दवाखान्याचा खर्च टप्याटप्याने घेऊन उपचार करतात.त्यामुळेच डाँ.अमोल शेजवळ यांना देवदुताचा दुसरा अवतार म्हटले तर वावगे ठरु नये.वास्तविक मुळव्याध व भगंदर सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कुणी योग्य मार्गदर्शन करणारा भेटत नसल्यामुळे या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते.आणि कुणी भेटलेच तर बंगाली बाबा डाँक्टराकडे किंवा आयुर्वेदीक डाँक्टराकडे पाठवितात त्यामुळे या आजारातून रुग्ण बरा होण्याऐवजी दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालवत जाते.मात्र लासलगावला डाँ.अमोल शेजवळ यांच्या दवाखान्याला जेव्हा “युवा मराठा न्युज”च्या ब्युरो टिमने भेट दिली,तेव्हा तेथील डाँ.अमोल शेजवळ यांचे वागणे व बोलण्यातून रुग्णांप्रती असलेली सौदार्हता व सोज्वळता जवळून बघावयास मिळाली.आलेल्या रुग्णांला समाधानकारक व आत्मिक हिंमत देऊन डाँ.अमोल शेजवळ करीत असलेली उपचार पध्दती अत्यंत वाखणण्याजोगतीच आहे.त्यामुळे अगोदरच आजाराने त्रस्त असलेला रुग्ण डाँक्टराच्या मानसिक हिंमत व धाडसामुळे लवकरच बरा होतो.हा येथील रुग्णांचा अनुभव खुप काही सांगून जातो.त्यामुळेच मुळव्याध व भगंदर आजाराने त्रस्त रुग्णांचे खरे अर्थाने देवदुत ठरलेल्या डाँ.अमोल शेजवळ यांना त्यांच्या रुग्णसेवेच्या वाटचालीस आम्ही “युवा मराठा न्युज”परिवाराच्या खुप खुप शुभेच्छा देऊन निरोप घेतला.
लेखन-राजेंद्र पाटील -राऊत
शब्दांकन-आशाताई बच्छाव