आशाताई बच्छाव
प्रेरणादायी शिक्षण देणारे शिक्षक,आई वडील हेच विद्यार्थ्यांचे खरे आदर्श गुरुवर्य होय
धुळे/नंदुरबार ब्युरो चीफ दिपक जाधव – येथील दिनांक ३जुलै रोजी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने लिहीलेले विचार जीवनातील प्रत्येक मानवाला घडविण्यासाठी जे आदर्श निर्माण करून जीवनात यशस्वी करतांना पाहीले गुरू हे आपले आईवडील होय,तर दुसरे गुरू हे आपले शिक्षक होय, जन्माला आलेला माणुस कीती जगला या पेक्षा तो कीती जन्मला यांचे उत्तर शोधण्यासाठी किंवा उदाहरण पाहण्यासाठी जास्त दुर न जाता आपल्या आसपास शोधा,सेवा कार्य करणारे,’शिक्षक’आपणास गवसले तर आपणास त्याची प्रचिती हमखास येईलच,संत रचना प्रमाणे आम्ही घडलो,तुम्ही ही घडताय,जसे, आईवडील मुलांना घडवितात,तसेच आपले आदरणीय गुरुवर्य आपणांस घडवितात हाच इतिहास आहे, आईवडील बोट धरून चालवतात मात्र शिक्षक बोट न धरता बोटात लेखनही देवुन , प्रत्येकाच्या जीवनातील जीवनाचा चित्रपट लिहून घेता हेच होय,या उदारमतवादी हेतुला उराशी बाळगून एक आदर्श गुरूजन म्हणुन शिक्षकांकडे पाहीले जाते..
शिक्षक हा एक दिपस्तंभ आहे,जीवनरूपी सांगतात भरकटलेल्या मानव रूपी जहाज असतो,अशा ज्ञानरूपी जहाजाला सुरक्षित किनार्यावर आणण्यासाठी दिशा दर्शक ठरणारा एक शाश्वत आधार म्हणजेच एक शिक्षक होय,ज्यांच्या एका शब्दाने अख्खं गाव एकत्र येत, ज्यांच्या एका सुचनेवर नवीन पिढी आकार घेते,जो लोकांमधील अन्याया विरूद्ध लढण्याचे बीच पेरतो,जो गरजवंताना सक्षम करण्यासाठी त्यांचा हात धरतो, उध्वस्त झालेल्या आणि खचुन गेलेल्या निरागस जीवाला नव्याने लढण्यासाठी तो’लढ’म्हणतो समाजाचा केंद्र बिंदू आणि संस्कृती चार कृपासिंधु म्हणजे शिक्षक होय,अशा बहु आताही व्यक्तीमत्वालाच खरोखर ‘शिक्षक’ही उपाधी शोभुन दिसते,
सज्जनहो परिवर्तन हा निसर्गाचा स्थायीभाव मानला जातो,काल असलेली परिस्थिती आज दिसणार नाही आणि आज असलेली स्थिती उद्या असणार नाही, परिवर्तनाच्या प्रक्रियेत समाजाची अंगे आणि प्रत्यांगे बदलत जातात ,काळ बदलतो वेळ बदलते आणि व्यक्ती देखील वयानुसार बदलतात,समाजातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन,तो स्वतः मधे सकारात्मक बदल करून घेतो,तोच खरा शिक्षक शोभतो,धुळपाटीवर काडीच्या सहाय्याने मुळाक्षरे शिकवणारा शिक्षक होय,काळ बदलल्यावर नाचुन गाऊन मुलांना समतेचे शिक्षण देतो,ते आदर्श गुरूजन,काळ्या फलकावर पांढर्या रेघोट्या काढणारा शिक्षक, संगणकावर कळा दाबुन आपल्या मुलांना अद्यावत शिक्षण देतो,नव्या युगाचा पाईक म्हणवणाऱा तोच खरा प्रेरणादायी शिक्षक असतो,
“गुरूला ब्रम्हा,गुरूला विष्णु,गुरूला देवो महेश्वरा” गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूदेव नमः ” अनादी काळापासुन ज्याची महती किंचीत ही कमी झाली नाही आणि होणारही नाही अशा अतुलनीय गुरूवर्यांना मानाचा मुजरा…ज्या गुरूंच्या सहाय्याने विविध अंगी विविध रूपांनी जे शिष्य घडतांना दिसतात ते बहुगुणी राहतात ,त्या गुरूंना प्रेरणादायी गुरुवर्य ही उपमा देताना मन अगदी भारावुन निघते,ज्या गुरूंच्या अंगी साक्षात ब्रम्हा, विष्णु, महेश,अवतरलेले असतात अशा त्रिगुणात्मक शिक्षकांना नमन करणारे विद्यार्थी घडतात,यांची अनंत ख्याती पुर्ण जगात द्विगुणित होते,”गुरूजन”या नावाची संकल्पना ही समाजात वावरणारी खुप मोठी संकल्पना आहे,ज्या गुरूंनी सकल जनसामान्यांना शिक्षक रूपी शिक्षण दिले त्यांनाच गुरूजी असे देखील संबोधले जाते,तोच खरा शिक्षकांचा गौरव होय,शिक्षक आणि मायबाप यांचा ज्यांनी आदर्श ठेवला अथवा आदर केला तोच खरा गुरू शिष्य मानावा,उदाहरण बघता अनाथांची माय स्वर्गवासी सिंधुताई सपकाळ होत,अनेक अनाथांची माय म्हणुन त्यांनी नाव लावले व आपल्या गुरू होण्याचा अभिमान बाळगला,ज्या अनाथांची माय होण्याचा त्यांना समाजाकडुन दिलेला सगळ्यात मोठा पुरस्कार होय,ज्यांनी अनेक संसार रूपी जीवन आत्मज्ञानानं घडविले,शिक्षक या नावाने अनेक समाज घडतात त्या समाजातुन अनेकांमधील अष्टपैलु होतात त्यावेळी शिक्षकांनी गुरूदक्षिणा दिल्याचा फार मोठा अभिमानाचा आदी व्याख्याता होण्याचा बहुमान प्राप्त होतांना दिसतो.
“आनंद या जीवनाचा सुगंधावरी दर्शनाला ”
“झिजुनी स्वतः चंदनाने दुसर्यास मधुगंध द्यावा”