राजेंद्र पाटील राऊत
मालेगांव पंचायत समितीपुढे
व-हाणे प्रकरणात आता
पुन्हा ११ जुलैपासून एल्गार
मालेगांव,( प्रतिनिधी विजय चांदणे)– व-हाणे,ता.मालेगांव प्रकरणात प्रशासनाकडून वारंवार दिरंगाई व निष्काळजीपणा करुन वेळकाढू धोरण ठेऊन न्यायासाठी वेठीस धरुन वंचीत ठेवणा-या प्रशासनाच्या निषेधार्थ युवा मराठा महासंघाच्या वतीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व-हाणे ,ता.मालेगांव प्रकरणाचा पाठपुरावा हा सलग तीन वर्षापासून सुरुच आहे.तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याच्या कारणावरुन व प्रशासन दोषी व्यक्तीना पाठीशी घालत असल्याचा निंदनीय प्रकार चव्हाटयावर येऊनसुध्दा प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे.असा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ ११ जुलै २०२३ पासून मालेगांव पंचायत समितीसमोर पुन्हा उपोषण आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला असल्याचे सांगितले.त्याबाबत सबंधिताना निवेदने देण्यात आलेली असून,व-हाणे प्रकरणात जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी हि मालेगांवचे गटविकास अधिकारी यांची असल्याचे स्पष्ट नमूद केलेले असल्याने त्याशिवाय व-हाणे ग्रामपंचायतीच्या बोगस व बनावट कारभाराची चौकशी सुध्दा मालेगांव पंचायत समिती प्रशासनानेच करायची आहे.त्यामुळे येत्या ८ जुलै २०२३ पर्यत दोषी असलेल्या सगळ्याच सबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास ११ जुलै पासून आमरण उपोषण आंदोलनाचा दिलेला एल्गार कुठल्याही परिस्थितीत राबविण्याचा इशारा शेवटी युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.