आशाताई बच्छाव
पक्ष वाढीसंदर्भात रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः पक्ष वाढीसंदर्भात मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी जालना येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दि. 12 जून रोजी पक्ष कार्यालयात बैठक घेवून विविध सुचना दिल्या. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर व पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे म्हणाले की, आगामी काळात निवडणुकांचे वारे वाहणार आहे. या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून गाव तेथे शाखा आणि घराघरात कार्यकर्ता तयार करावा असे त्यांनी सांगीतले. बनसोडे यांचा रिपब्लिकन सेना जालन्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तृतीय पंथीय विद्या कोळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. जालना तालुक्यातील सावरगाव येथील नितीन आढाव, अर्जुन आढाव, संदीप आढाव, रतन आढाव आणि बदनापूर तालुक्यातील संगीता पाटोळे, परतूर तालुक्यातील जालिंदर भालके, धंमदीप भालके, प्रविण आव्हाड, विजय मुंढे, समाधान सिरसाट, अशोक मुंढे, छगन बोराडे, राजाराम पवार याच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यावेळी या सर्व नुतन कार्यकर्त्यांचे हार घालुन स्वागत करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बबन साठे, शहर उपाध्यक्ष सुनिल पांडे, शेषराव दाने, ज्ञानदेव खरात आदींची उपस्थिती होती.