Home नागपूर वनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य.

वनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य.

96
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230529-074249_WhatsApp.jpg

वनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य.

वनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या मागण्या रास्त- मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांचे प्रतिपादन

वैभव पाटील पालघर

नागपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वनभवन येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला नागपूर विभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा हे प्रामुख्याने हजर होते. तसेच भंडारा उपवनवनसंरक्षक राहुल गवई, गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंग व तसेच वर्धा उपवनसंरक्षक राकेश सेपॅट हे व्हिडीओ कान्फरन्स द्वारा सहभागी झाले. तसेच प्रीतम कोडापे विभागीय वनाधिकारी (दक्षता), मारबत प्रशासकीय अधिकारी व नागपूर वनवृत्ताचे सर्व सहाय्यक वनसंरक्षक व सर्व वन परिक्षेत्र अधिकारी विडिओ कॉन्फरेन्स द्वारा सहभागी झाले.
या बैठकीमध्ये वनरक्षक व वनपाल यांचे पदोन्नती, तसेच सुधारित वेतनश्रेणी, वनविभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत, वनरक्षक व वनपाल यांना गस्तीकरिता दुचाकी मिळणेबाबत, वनविभागातील भरती प्रक्रियेमध्ये पोलीस विभागाप्रमाणे वनकर्मचारी ह्याच्या पाल्ल्यांना ५ टक्के आरक्षण मिळणेबाबत,वनकर्मचारी यांचेवर वन्यप्राणी तसेच गुन्हेगार यांचेकडून होत असलेले हल्ल्या बाबत , वनरक्षक व वनपाल यांना दरवर्षी न चुकता शासकीय गणवेश मिळणेबाबत, उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना उतेजनार्थ बक्षीस मिळण्याबाबत, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत्तर कामाचा निधी वर्ग करणेबाबत, सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत मिळणेबाबत, सेवाजेष्ठता यादी दरवर्षी अद्यावत करून प्रसिद्ध करणेबाबत, विभागीय चौकशी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणेबाबत, प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयात महिला कर्मचारी यांच्याकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह बांधणेबाबत, जीर्ण झालेली निवासस्थाने पाडून नवीन निवासस्थाने बांधकाम करणेबाबत, साप्ताहिक रजेचा मोबदला मिळणेबाबत, पोलीस विभागाप्रमाणे कामाच्या तासांचे वाटप करणे व अतिरिक्त कामाचे वेतन व भत्ते मिळणेबाबत, वन्यजीव विभाग व अतिदुर्गम भागात काम करणारे वनरक्षक, वनपाल यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करणेबाबत, महिला प्रवर्गातील वनरक्षक, वनपाल यांना कामाचे तास निर्धारित करून अतिसंवेदनशील क्षेत्रात जोखमीची कामगिरी न देणे बाबत, वैद्यकीय कॅश लेस सुविधा लागू करणेबाबत, आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर मिळणेबाबत, इत्यादी व तसेच वयक्तिक स्तरावर वनरक्षक व वनपाल यांनी मांडलेल्या इतर मागण्या यावर सविस्तर चर्चा होऊन मुख्य वनसंरक्षक यांनी यातील बहुसंख्य मागण्या मान्य करणार असे आश्वासन दिले. बैठकीला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील , कार्याध्यक्ष माधव मानमोडे, नागपूर वनवृत्ताचे अध्यक्ष शसतीश गडलिंगे, रमेश आदमने, अरुण पेंदोरकर, उंचीबगले , सय्यद शेख भंडारा, सचिन कापकर- वर्धा , अनिल खडतकर, शुक्ल, वैलथरे, . आनंद तिडके, संतोष पांडे, समीर नेवारे, कुमारी अनिता करवेडकर, दिगंबर गुंडेवार, उमेश बंगर, तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया व नागपूर वनविभागातील संघटनेचे इतर पदाधिकारी सभेला उपस्थित

Previous articleनिराधारांचे आधारस्तंभ नागापुरचे सरपंच राजाभाऊ पवार
Next articleवांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here