आशाताई बच्छाव
भा.प्र.से.शिवानंद टाकसाळे पूनच्छ: म.फुले जनारोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राज्य अकोला,(शाहनवाज शाह प्रतिनिधी)-शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र
शासनाची आयुषमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित् योजनेचे सनियंत्रण व प्रभावीपणे
अमलबजावणी करण्याकरिता मुख्य् कार्यकारी अधिकारी या पदावर श्री.शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रस्थापित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही एकत्रित योजनांना गती देण्यासाठी व योजनेचा लाभ गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात व्हावा याकरिता शिवानंद टाकसाळे यांनी ह्या दोन्ही योजना अतिशय मोठ्या प्रमाणात राबवून त्यामध्ये अमुलाग्र बदल घडून आणलेले आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे 2012 या वर्षापासून तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी योजनेचे फक्त दीड लाख रुपये प्रति वर्ष प्रत्येक कुटुंब असताना देखील त्यांनी संयुक्तिक प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सोबत एकत्रीकरण करून प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लक्ष रुपयांचा लाभ प्रत्येक कुटुंबाला करून देण्याचे नियोजन केले असल्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला पाच लक्ष रूपयाचे वैद्यकीय आर्थिक मदतीचे नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष्मान प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबविली होती.श्री शिवानंद टाकसाळे हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी,कायदेतज्ञ आणि उच्च विद्याविभूषित असून त्यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्र प्रशासन सेवेत विविध पदांवर काम केलेले आहे.परीवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी वर्धा,गडचिरोली,उपायुक्त रोजगार हमी योजना अमरावती तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी बुलढाणा ते मुख्य कार्यकारी अधिकारी,परभणी या प्रवासादरम्यान त्यांनी महत्वाच्या पदावर कार्य करून एक अतिशय कर्तव्यदक्ष व कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी,राज्य आरोग्य हमी सोसायटी या पदावरून सेवानिवृत झाल्यानंतरही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री नामदार श्री.देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे आरोग्य मंत्री नामदार श्री.तानाजी सावंत यांनी एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात प्रभावी पणे चालविण्या करिता व योजनेचा लाभ असंख्य लाभार्थ्यांना मिळण्याकरिता भा.प्र.से श्री.शिवानंद टाकसाळे यांची पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर एक वर्षासाठी नियुक्ती केली असून या नियुक्तीने श्री.शिवानंद टाकसाळे यांना प्रशासन सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याची मिळालेली खरी पावती असल्याचे बोलल्या जात आहे…